पुणे: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये उन्हाचा तडाखा जरी वाढला असला, तरीही पालकांनी मुलांना वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये ,शिबिरांमध्ये सोडणे काही थांबवलेले नाही. मुलं अतिशय उत्साहाने रणरणत्या उन्हात सुद्धा वेगळ्या प्रकारची कला, क्रीडामध्ये भरभरून प्रवेश घेत आहेत, पैसेही भरपूर भरून शिबिरामध्ये भाग घेत आहेत , पण प्राध्यापक देवदत्त पाठक त्यांचा शिष्य नाट्य प्रशिक्षकमिलिंद केळकर आणि त्यांची गुरुस्कूल फाउंडेशन गुफान संस्था मात्र २१ कार्यशाळा अभिनयाच्या तेही मोफत घेत आहेत, चक्क मोफत कुठल्याही प्रकारचा मानधनाचा एक रुपया न घेता तेही रंगभूमी कला गावागावात वाड्या वस्त्यांवरती,अगदी झोपडपट्टीमध्ये सुद्धा पोचवण्यासाठी, आजच्या काळात रणरणत्या उन्हात कुठल्याही प्रकारची आर्थिक अपेक्षा न ठेवता अशा प्रकारचं काम करणारी माणसं निराळीच असतात त्यापैकी आहेत. प्रा. देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर आणि गुफान या संस्थेचा सहकारी चमू आहे.
या मोफत अभिनय कार्यशाळा सुरू झाल्या आहेत १५ एप्रिलपासून ते १० जूनपर्यंत. प्रत्येक ठिकाणी दोन किंवा तीन दिवस अशा प्रकारच्या कार्यशाळा घेऊन त्यामध्ये रंगभूमी कलेचे मूलभूत घटक आणि अभिनयाचे बाळकडू मुलांमध्ये रुजवण्याचे काम होत आहे. रंगभूमी कलेच्या वर्तन-तंदुरुस्तीचा सिद्धांत वापरणाऱ्या प्राध्यापक देवदत्त पाठक यांची ही संकल्पना गेल्या ११ वर्षापासून चालू आहे, त्यामध्ये व्यक्तिमत्व विकसन आणि क्षमता विकसन यावरती प्रमुख लक्ष केंद्रित करून मुलांना रोज एखादं तरी नाटक करायची संधी या कार्यशाळांमधून मिळत आहे. अशा कार्यशाळांना स्थानिक सरपंच, पाटील, संचालक आणि सामाजिक संस्था मदत करत आहेत .अशा कार्यशाळा वेगवेगळ्या ठिकाणी पुण्याच्या आसपासची उपनगरे आणि महाराष्ट्रामध्ये जिथे अशा प्रकारची रंगभूमी कला फारशी पोहोचली नाहीये अशा ठिकाणी या कार्यशाळा होत आहेत. त्यामध्ये कारंजा लाड, अकोला नारायणगाव , जुन्नर , पुण्याची आसपासची उपनगरे, पिंपरी चिंचवड, दापोडी, खडकी, आंबेगाव, नरेगाव आणि अनेक वाड्या वस्त्या यामध्ये अशा प्रकारच्या कार्यशाळा १०जूनपर्यंत होत आहेत.
आजच्या काळात पैसे कमवणारे खूप, पण पैसे कमवण्यापेक्षा खास वंचितांसाठी त्यांच्या निर्मळ आनंदासाठी आणि त्यांच्या उन्हाळ्या सुट्टीला आनंदी करण्यासाठी प्रा. देवदत्त पाठक हे रंगभूमी कला ही तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न आहेत. रंगभूमी कला ही वर्तन तंदुरुस्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यातून मुलांचं वागणं बोलणं आणि एखाद्या विशिष्ट ध्येयावरती लक्ष केंद्रित करणे नेमकं होऊ शकतं, असं यानिमित्ताने प्राध्यापक देवदत्त पाठक यांनी सांगितले. आपले गुरु पंडित दामोदर प्रल्हाद पाठक शास्त्री आणि वासुदेव पाळंदे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वर्षातून काही दिवस तरी विनाशुल्क (फ्री ऑफ कॉस्ट) मुलांसाठी अशी मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिरे घेतली जात आहेत. त्यासाठी विशेषतः वंचितांसाठी काम कर यासाठी प्राध्यापक देवदत्त पाठक आणि त्यांचा शिष्य मिलिंद केळकर हे अशा प्रकारचे अभिनय शिबिर म्हणजेच प्रबोधन शिबिर घेत आहेत.
या अशा प्रकारच्या कार्यशाळांमधून तळागाळापर्यंत (ग्रासरूट लेवल) रंगभूमी कला पोहोचेल आणि उद्याचा सुजाण प्रेक्षक आणि सुजाण कलाकार रंगभूमीसाठी मिळेल अशा आशेने या अशा प्रकारच्या कार्यशाळांचं आयोजन केलेले आहे, असे गुफान या संस्थेच्या प्रवक्त्या सीमा जोगदनकर यांनी कळवले आहे.उषा देशपांडे, ऋतुजा केळकर, आलोक जोगदनकर, धनश्री गवस अक्षता जोगदनकर या विद्यार्थी सहकाऱ्यांच्या मदतीने या २१ मोफत अभिनय कार्यशाळा संपन्न होत आहेत.