मुंबई: द्विपक्षीय सहकार्याला चालना देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) आणि असोसिएसी मॅनेजर इन्व्हेस्टासी इंडोनेशिया (AMII), इंडोनेशियन इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स असोसिएशनने द्विपक्षीय आर्थिक वाढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इंडोनेशियाच्या म्युच्युअल फंड उद्योगातील १२ शीर्ष सीईओंचे शिष्टमंडळ सध्या इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींसोबत भारत भेटीवर आले. नवी दिल्ली येथे सहकार्याद्वारे सर्वोत्तम आर्थिक पद्धती राबवण्यासाठी २५ जानेवारी२०२५ ला सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी करण्यात आली. ही भागीदारी दोन्ही देशांमधील म्युच्युअल फंड क्षेत्रांना बळकटी , उद्योग मानके समृद्धी, गुंतवणूकदारांचे शिक्षण आणि आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन, अधिक गतिमान, पारदर्शक आणि जागतिक स्तरावर एकात्मिक म्युच्युअल फंड इकोसिस्टमसाठी मार्ग मोकळा करण्यासाठी करण्यात आली आहे.
भारत आणि इंडोनेशियातील म्युच्युअल फंड उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार सर्वोत्तम पद्धती, अंतर्दृष्टी आणि धोरणांची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करेल. या भागीदारीमध्ये नियामक सुधारणांची आवश्यकता, प्रशासन मानके, गुंतवणूकदारांच्या संरक्षणाची आवश्यक पावले, डेटा विश्लेषण, संशोधन, उत्पादन नवकल्पना आणि दोन्ही देशांना एकमेकांच्या कौशल्याचा तसेच अनुभवांचा फायदा होईल याची खात्री करण्यासाठी जोखीम व्यवस्थापनाची आवश्यकता यासह या क्षेत्राच्या व्यापक स्पेक्ट्रमची समज आणि गरज समाविष्ट केली जाईल.
या ऐतिहासिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (AMFI) इंडोनेशियातून आलेल्या असोसिएसी मॅनेजर इन्व्हेस्टासी इंडोनेशियाच्या (AMII) शिष्टमंडळासाठी एका परिषदेचे आयोजन केले होते. यात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे प्रमुख पैलू, म्युच्युअल फंड क्षेत्रातील संधी आणि भांडवली बाजार चालविण्यामध्ये तंत्रज्ञानाची निर्णायक भूमिका यावर प्रकाश टाकला होता. या परिषदेत गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक (GIFT) सिटीमधील उदयोन्मुख संधींचाही शोध घेण्यात आला आणि आर्थिक नवकल्पनेसह प्रशासनामध्ये भारताच्या नेतृत्वावर भर देण्यात आला.
या गोलमेज परिषदेतील प्रमुख वक्ते जी२० आणि निती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शेर्पा अमिताभ कांत, सीएएमएसचे व्यवस्थापकीय संचालक अनुज कुमार, इंडोनेशियातील असोसिएसी मॅनेजर इन्व्हेस्टासी इंडोनेशियाचे (AMII) अध्यक्ष हनीफ मांटिक, इंडोनेशियन स्टॉक एक्सचेंजचे (IDX) आयुक्त मोहम्मद ओकी रमाधना, एशिया पॅसिफिक रिजनल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (APRDI) आणि पीडब्ल्यूएमआयआयचे (PWMII)अध्यक्ष मार्संगप पी तांबा होते.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे (AMFI) अध्यक्ष नवनीत मुनोत म्हणाले, ‘भारताचे इंडोनेशियासोबतचे सहकार्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या विकसित भारत २०४५ च्या ध्येयाशी जोडलेले आहे. तसेच इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यपूर्तीच्या शताब्दी वर्षात म्हणजेच २०४५ पर्यंत विकसित अर्थव्यवस्था होण्याच्या इंडोनेशियाच्या लक्ष्याशी देखील जोडलेले आहे. आर्थिक सहयोग आणि परस्पर वाढीस चालना देणाऱ्या, ग्लोबल साउथच्या नेतृत्वाप्रती भारताच्या वचनबद्धतेचा ही भागीदारी पुनरुच्चार करते. भारताच्या म्युच्युअल फंड क्षेत्राच्या यशाचे उदाहरण म्हणून मजबूत भांडवली बाजार आणि भरभराट करणारा मालमत्ता व्यवस्थापन उद्योग हे टप्पे गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. या सहकार्यामुळे दोन्ही देशांमध्ये शाश्वत आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक म्युच्युअल फंड उद्योगाचा पाया रचला जाईल.’
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे मुख्य कार्यकारी(AMFI) व्यंकट चालसानी म्हणाले, ‘भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही देशांतील म्युच्युअल फंड उद्योगाच्या वाढीतील हे सहकार्य हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. एकत्र काम करून, आम्ही मार्केटच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या आर्थिक उद्योग, शासन मानके, गुंतवणूकदारांच्या विश्वासाला बळ देणे आणि नावीन्यपूर्ण अनोखे उपक्रम अशा घटकांबाबत समजून घेण्याची एक अनोखी संधी निर्माण करत आहोत. या सामंजस्य करारामुळे उद्योग संस्थांच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ होईल.’
इंडोनेशियातील असोसिएसी मॅनेजर इन्व्हेस्टासी इंडोनेशियाचे (AMII) अध्यक्ष हनीफ मांटिक म्हणाले, ‘जागतिक पातळीवरील म्युच्युअल फंड मार्केटच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा क्षण आहे. एकमेकांच्या नियामक फ्रेमवर्क आणि गव्हर्नन्स स्ट्रक्चर्समधून शिकून, आम्ही आमच्या गुंतवणुकदारांना अधिक सुरक्षितता आणि नवीन ऑफर्स ऑफर करू शकू. एएमएफआयसह (AMFI) सहकार्य हे उदयोन्मुख बाजारपेठांमधील आर्थिक क्षेत्रांमधील बंध मजबूत करण्यासाठी एक मॉडेल म्हणून काम करेल.’