पुणे: केवळ काळा पडद्यावरती आणि कुठल्याही प्रकारचे भव्य दिव्य सेटिंग न वापरता दोन हॅलोजन वरती किंवा घरच्याच प्रकाश योजनेवरती याचे प्रयोग होत आहेत. लेखनातील विषय, आशय संपन्नता आणि अभिनयाच्या दमदार जोरावर बबड्या बोलकी या नाटकाचे ४० दिवसात २५ प्रयोग झाले. लहान बरोबर मोठ्यांनाही अंतर्मुख करणारा डोळ्यात अंजन घालणारे हे नाटक सर्वांनाच आवडते आहे. मुलांचा आणि पालकांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
नाटक हे केवळ मनोरंजनासाठी नसून ते प्रबोधन आणि संदेश देणारे असायलाच हवेत, यासाठी मुलांची विशेषता बाल रंगभूमी किंवा कुमार रंगभूमी उपयोगात आणायला हवी, या हेतूने हे नाटक देवदत्त पाठक यांनी लिहून दिग्दर्शित केले आहे आणि मिलिंद केळकर यांच्या प्रमुख सहाय्यक दिग्दर्शनातून बबड्या बोलकी या नाटक उभे राहिले आहे. बाल, कुमार,किशोर, युवा ,प्रौढ,असे कुठल्याही वयोगटासाठी हे नाटक महत्त्वपूर्ण ठरते आहे. नाटकाचा प्रयोग सर्वांनाच अंतर्मुख करतो आहे. ऑनलाइन गेम्स तसेच व्हिडिओ गेम्स ,मोबाईलचा अतिवापर यामुळे अनेकजण वेळेचा अपव्यय, उर्जेचा ऱ्हास, अनेक वेगळ्या प्रकारचे शारीरिक त्रासाल सामोरे जात आहेत.त्यावर वेगळाच उपाय सांगणारे ज्येष्ठांच्या अस्तित्वाला मोठं करणारे हे नाटक सगळ्यांनाच आवडते आहे.
शाळा,महाविद्यालयानंतर सामाजिक तसंच कला संस्था त्यांच्या मदतीसाठी तसेच वस्त्या आणि पाड्यांमध्ये हे नाटक होताना सर्वांचा भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. यामध्ये कुठल्या प्रकारे भरपूर मानधनाची अपेक्षा न ठेवता केवळ नाटक घरात पोहोचावे आणि सर्वांच्यासाठी त्यांनी आनंद निर्माण करावा, यासाठी हे केवळ ऐच्छिक मानधनावरती हे नाटक होत आहे ,सूत्रधार म्हणून उषा देशपांडे सीमा जोगदनकर आणि ऋतुजा केळकर हे काम पाहतात. तर कलाकारांमध्ये गुरुस्कूल फाउंडेशन, गुफानचे विद्यार्थी कलाकार अर्णव देशपांडे, आलोक जोगदनकर, सायली चव्हाण,अंजली चव्हाण, धनश्री गवस अक्षता जोगदनकर ,आर्या करपे असे बाल कुमार आणि युवा कलाकार आपापली शाळा-महाविद्यालय सांभाळून काम करत आहेत. सध्याच्या काळात नाटकाचा खर्च पेलवणारा नाही, अशा परिस्थितीतही कमी खर्चात मागचा काळा पडदा दोन हॅलोजन आणि पूरक संगीत यावरती बबड्या बोलकी या नाटकाचा प्रयोग होतो. निर्मितीमध्ये एकाअर्थाने दिलासा देणारी ही प्रायोगिकता आहे. केवळ दिग्दर्शकीय कमाल आणि अभिनयाची दमदार जोरावर गुरु स्कूल गुफानचे हे नवीन नाटक सगळ्यांच्यासाठी कुठेही वेळेच्या सोयीने करण्यासाठी सज्ज झाले आहे.
२५ वा प्रयोग नुकताच एसएनडीटी कन्या शाळा आणि महाविद्यालय या १०६ वर्षाच्या शाळेमध्ये संपन्न झाला. त्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून प्रशंसा केली आणि शेकडो विद्यार्थ्यांनी भारावून जाऊन आम्ही मोबाईलचा नेमका वापर करू, अशी शपथही घेतली.