मुंबई:द स्लीप कंपनी (The Sleep Company) या भारतातील आघाडीच्या कम्फर्ट-टेक ब्रँडचे आर्थिक वर्ष २५ च्या अखेरपर्यंत नफा संपादित करण्याचे लक्ष्य आहे. स्थापनेपासून अवघ्या ४.५ वर्षांमध्ये कंपनीने ५०० कोटी रूपयांचा एआरआर (अॅन्युअल रिकरिंग रेव्हेन्यू) टप्पा संपादित केला आहे. आतापर्यंतच्या या सर्वात मोठ्या टप्प्यामधून प्रेरणा घेत कंपनीने पांरपारिक मॅट्रेस उद्योगामध्ये धुमाकूळ निर्माण केला आहे आणि आपल्या १०० सीओसीओ (कंपनी-ओन्ड, कंपनी-ऑपरेटेड) स्टोअर्ससह फर्स्ट-मूव्हर लाभदायी असण्याचे सिद्ध केले आहे. ऑफलाइन रिटेल क्षेत्रात प्रवेश केल्यापासून फक्त दोन वर्षांमध्ये हे यश संपादित करणारा हा भारतातील सर्वात गतीशील डी२सी ब्रँड आहे. कंपनीने जून २०२२ मध्ये बेंगळुरू येथे पहिल्या स्टोअरचे उद्घाटन केले.
२०१९ मध्ये प्रियंका व हर्षिल सलोट यांनी स्थापना केलेली टीएससी स्मार्टग्रिड तंत्रज्ञानाची जगातील पहिली व एकमेव आहे, जी स्लीप व सीटिंग सोल्यूशन्समध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे. देशातील झपाट्याने विकसित होत असलेला ब्रँड मॅट्रेस उद्योगामधील डी२सी, तसेच ओम्नीचॅनेल लँडस्केपला नवीन आकार देण्यामध्ये अग्रस्थानी आहे. कंपनी अनेक उत्पादने देते, जसे मॅट्रेसेस, सोफा, पिलोज, कुशन्स, बेडिंग, ऑफिस चेअर्स, स्मार्ट रिक्लायनर बेड इत्यादी.
कंपनीच्या कार्यसंचालनामधून प्राप्त महसूलाने आर्थिक वर्ष २३ मध्ये १२७.१४ कोटी रूपयांचा टप्पा पार केला, जिथे आर्थिक वर्ष २० मधील ७४.०५ लाख रूपयांच्या तुलनेत मोठी वाढ दिसण्यात आली. द स्लीप कंपनी पुढील २ ते ३ वर्षांमध्ये १००० कोटी रूपयांचा महसूल गाठण्यास उत्तमरित्या सुसज्ज आहे. हे स्मार्ट ध्येय नेतृत्वाचा धोरणात्मक दृष्टिकोन आहे आणि भारतभरातील विस्तारीकरण योजनांसह सर्वसमावेशक विकास धोरणामधून संचालित असेल. कंपनी आपली बाजारपेठ स्थिती आणि ओम्नीचॅनेल उपस्थिती दृढ करण्याचा प्रयत्न करत आहे. द स्लीप कंपनी आपल्या कर्मचारीवर्गाला प्रबळ करत २०२४ च्या अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या १,००० वरून १,३०० ते १,४०० कर्मचाऱ्यांपर्यंत वाढवणार आहे.
द स्लीप कंपनीच्या सह-संस्थापक प्रियंका सलोट म्हणाल्या, “ही जलद वाढ आणि या विस्तारीकरणाचे श्रेय नाविन्यपूर्ण उत्पादने, आमच्या ओम्नीचॅनेल उपस्थितीचे विस्तारीकरण आणि ग्राहक समाधानाप्रती आमच्या अविरत कटिबद्धतेला जाते. आम्ही आमच्या विकास धोरणामध्ये नाविन्यतेला प्राधान्य देतो आणि आमचे पेटण्टेड स्मार्टग्रिड तंत्रज्ञान आम्हाला स्पर्धात्मक अग्रस्थान देते, तसेच आम्हाला उद्योगामध्ये वचरढ ठरवते. आम्ही आता ‘हाऊस ऑफ ब्रँड्स’ म्हणून आमचे स्थान अधिक दृढ करण्यास आणि उद्योगामध्ये नवीन मानक स्थापित करत आमची उत्पादन श्रेणी विस्तारित करण्यास उत्सुक आहोत. आमच्या भावी उत्पादनांमध्ये एआयचा समावेश आम्हाला ग्राहक अनुभव अधिक उत्साहित करण्यास साह्य करेल. आम्ही या विकास प्रवासाचा भाग असण्यासाठी आमचे कर्मचारी, ग्राहक व गुंतवणूकदारांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. आम्ही आमच्या स्लीप व सीटिंग सोल्यूशन्सच्या माध्यमातून व्यक्तींचे जीवन सुधारण्याप्रती कटिबद्ध आहोत.”
द स्लीप कंपनीचे सह-संस्थापक हर्षिल सलोट म्हणाले, “२०१९ मध्ये आम्ही टीएससी लाँच केली तेव्हा मॅट्रेस उद्योग अत्यंत खंडित व असंघटित होते आणि वितरक व डिलर्सचे वर्चस्व होते. आमचा विश्वास आहे की, आमच्या ओम्नीचॅनेल उपस्थितीने क्षेत्रात धुमाकूळ निर्माण केला आहे. ग्राहक वर्तणूकीचे विश्लेषण केल्यानंतर आम्ही अंतर्गत ‘आरओपीओ’ तत्त्व म्हणजेच ‘रिसर्च ऑनलाइन, परचेस ऑफलाइन’ तयार केले आहे, जिथे ग्राहक ऑनलाइन आमच्या उत्पादनांचा शोध घेतात आणि त्यानंतर स्टोअरमध्ये प्रत्यक्ष उत्पादनाचा अनुभव घेत खरेदी करतात. आमच्या सीओसीओ स्टोअर्सनी आम्हाला बाजारपेठेत अग्रस्थान मिळवून दिले आहे. हे स्टोअर्स आम्हाला ग्राहकांना उच्च दर्जाचा अनुभव देण्यास मदत करतात, ज्यामधून विनासायास डिलिव्हरीची खात्री मिळते आणि त्यांच्या शंका व समस्यांचे प्रत्यक्षात निराकरण केले जाते. आम्हाला भारतात १०० स्टोअर्स असण्याचा हा मोठा टप्पा संपादित करण्याचा आनंद होत आहे आणि आम्ही बाजारपेठेत सखोल उपस्थितीसह आरामदायीपणा व उत्पादकतेच्या मर्यादांना दूर करण्याप्रती कटिबद्ध आहोत.”
कंपनीचे मुंबई व बेंगळुरू प्रत्येकी एक अशी दोन उत्पादन केंद्रे आहेत. डिसेंबर २०२२ पासून कंपनीने दर ४ ते ५ दिवसांनी एक स्टोअर सुरू केले आहे आणि सर्व टीएससी स्टोअर्स कार्यसंचालनांना सुरूवात केल्यापासून ईबीआयटीडीए लाभदायी आहेत.कंपनी आपल्या ओम्नी-चॅनेल उपस्थितीमधून ८५ टक्के विक्री करते, ज्यामध्ये रिटेल स्टोअर्स आणि त्यांच्या वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन विक्रीचा समावेश आहे. कंपनीचा भारतातील ऑफिस चेअर्ससाठी सर्वात मोठा बाजारपेठ हिस्सा आहे, जेथे चेअर श्रेणी लाँच केल्यापासून उल्लेखनीय १० पट वाढ झाली आहे. कंपनी नुकतेच लाँच केलेला चेअर ब्रँड ‘एर्गोस्मार्ट बाय द स्लीप कंपनी’सह पुढील २४ महिन्यांमध्ये बाजारपेठ हिस्सा दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहे. टीएससीने आतापर्यंत डिसेंबर २०२३ मध्ये प्रेमजी इन्व्हेस्ट व फायरसाइड व्हेंचर्सकडून सिरीज सी फंडिंग राऊंडमध्ये १८४ कोटी रूपयांचा निधी उभारला आहे, तसेच प्रेमजी इन्व्हेस्ट, फायरसाइड व्हेंचर्स व अल्टेरिया कॅपिटलकडून सिरीज बी फंडिंग राऊंडमध्ये १७७ कोटी रूपयांचा निधी आणि प्री-सिरीज ए फंडिंग राऊंडमध्ये १३.४ कोटी रूपयांचा निधी उभारला आहे.