जागतिक रंगभूमी दिनानिमित्त हे सर्व कशासाठी ?

पुणे:जागतिक रंगभूमी दिनानिमित्त हे सर्व कशासाठी? रंगभूमी कला कशासाठी?असा सवाल जागतिक थेएटर इंटरनॅशनल ऑलिंपिकचे सर्वे सर्वा फिडोरस टरझोपोलस या ग्रीक रंगकर्मींनी त्यांच्या रंग संदेशातून असा प्रश्न केला आहे? जागतिक रंगभूमी दिनानिमित्त गुरुकुल गुफांन च्या वतीने जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. त्यावेळेला ग्रीक रंगकर्मी फिडोरस टर्झोपोलस यांनी अत्यंत वेदनेने निर्माण केलेल्या प्रश्नाला अनुसरून प्रा. देवदत्त पाठक यांनी रंगभूमी कला कशासाठी यावरती त्याचे विस्तृत विवेचन केले आणि त्यांचा रंग संदेशही वाचून दाखवला. खरंतर कलेतून सामाजिक भान प्रबोधन ,उद्बोधन होणे गरजेचे आहे असे मानले.

रंगभूमी कलेबद्दलची आस्था ही किमान होत असून स्वतःबद्दलच्या प्रतिमा आणि इगो कुरवाळण्याच्या संकल्पनांची जंत्री चालू असताना दिसते. खरंतर दुःख, वेदना ,खंत यातून बाहेर काढून दिलासा देणारे काम रंगभूमी कलेच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. सर्वाधिक जण वैयक्तिक महत्त्वकांक्षा आणि अहंकार याला कुरवाळताना दिसतात, रंगभूमी कलेचे आजचे स्वरूप कमी अधिक प्रमाणात याच पद्धतीने प्रयोग प्रशिक्षण प्रकाशन यातून साजरे होताना दिसते, असे प्रतिपादन यानिमित्ताने प्रा.देवदत्त पाठक यांनी केले. त्याला अनुसरून ‘मोठी झालीस तू’ आणि ‘ॲक्टर व्हायचंय तुला’ या दोन नाविन्यपूर्ण विषयांचे सादरीकरण जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने गुरु स्कूल गुफांनच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत साजरे झाले .

गाव, वस्त्या, पाड्यांवरील लहान मुलींना आलेली मासिक पाळी त्याबाबत रूढी, परंपरा आणि गैरसमज यावर प्रहार करणारे हे नाटक तर ‘मोठी झालीस तू’. तर रंगभूमी कला ही टाईमपास नसून ती सुद्धा एक ध्यास आणि कलेच्या प्रती असलेली विशुद्ध आस्था या दृष्टीने येणाऱ्या प्रत्येक अभिनेत्याची जडणघडण व्हावी या विषयावरती ‘ॲक्टर व्हायचे तुला?’ ही दोन धाडसी नाटके सादर करण्यात आली. नाट्यकलेची निर्मिती ही जर बघणाऱ्याच्या आणि करणाऱ्याच्या मनात जोश उत्साह योग्य प्रकारची त्यामागची भूमिका यासाठी प्रेरणादायक हवी. यासाठी हा दिवस जगातल्या २७२ देशांमध्ये साजरा केला जातो. रंगभूमी कला याचे व्यावसायिकरण आणि त्याच्या मागचा असलेला सुमार व्यापार थांबला पाहिजे, त्या दृष्टीने सर्व रंग कर्म प्रेमींनी एकत्र येऊन एक चळवळ म्हणून हे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन यानिमित्ताने प्रा. देवदत्त पाठक यांनी केले.

या सगळ्या वेगळ्या विषयांवरच्या दोन नाट्यप्रयोगात गौरी पत्की, निर्मिती करपे, ऋतुजा केळकर, धनश्री गवस, अक्षदा वाघवसे, अर्णव देशपांडे ,मल्हार बनसोडे ,अक्षता जोगदनकर, अलोक जोगदनकर , आणि देवदत्त पाठक यांनी अभिनयाचा सहभाग घेतला तर तंत्र सहाय्य गौरी बनसुडे,दर्शन पोळ, प्राजक्ता जेरे , आर्या करपे,अथर्व जाधव यांनी तंत्र सहाय्य केले. रंगभूमीचे प्रयोजन निर्मिती कशासाठी तिचा वापर योग्य पद्धतीने व्हावा, असे आवाहन या निमित्ताने सर्वांना करण्यात आले. एस एन डी टी च्या प्राचार्य माया कोथळीकर, विजयश्री महाडिक, हेमंत जेरे, किशोर महाबोले, श्रीराम ओक यांच्यासह अनेक मान्यवरांनी जागतिक रंगभूमी साजरा करण्यासाठी आपला सहभाग नोंदवला . हे सर्व कशासाठी? तर रंगभूमी कला माध्यमातून सामाजिक भान जपण्यासाठी प्रत्यक्ष कृती करायची या निश्चयाने सर्वजण या दिवशी भारावून गेले .