मुंबई: ऑटोकार इंडिया आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नुकताच ‘वुमन विथ ड्राईव्ह’ उपक्रमाचा पाचवा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. मुंबईतील व्हिक्टोरिया साउथ येथून सुरू झालेल्या या मोहिमेत ३५ हून अधिक महिलांनी भाग घेतला होता. महिलांनी यावेळी ऍम्बी व्हॅली एअरस्ट्रीपवर वेग, अचूकता आणि धाडसाची परीक्षा पाहणाऱ्या विविध आव्हानांमध्ये भाग घेतला. महिंद्राच्या अत्याधुनिक एक्सयुव्ही ७०० च्या ताफ्यातून महिलांचा हा प्रवास सुरू झाला होता.
महिलांच्या आत्मविश्वासासोबत महिंद्राच्या गाड्यांची उत्कृष्टता या मोहिमेत अधोरेखित झाली. एक्सयुव्ही ७०० गाडीतील इन्फोटेन्मेंट सिस्टम आणि १२ स्पीकर सोनी थ्रीडी ऑडिओ सिस्टीममुळे प्रवास अधिक मनोरंजक झाला. महिंद्रा थार थ्री डोअर, महिंद्रा थार रॉक्स आदी गाड्या मोहिमेत सामील होत्या.
महिलांना गाड्या चालविण्याचा आत्मविश्वास प्राप्त करून देणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे ऑटोकार इंडियाच्या रेणुका कृपलानी यांनी यानिमित्ताने सांगितले. सशक्तीकरण म्हणजे केवळ गाड्या चालवणे नव्हे, तर प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जाणे हा महिंद्राचा दृष्टीकोन असल्याचे महिंद्रा ऑटोमोटिव्हच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर मंजरी यांनी नमूद केले.