इझमायट्रिपची प्रवाशांसाठी विशेष आकर्षक सवलती !

मुंबई : भारताचा सर्वात मोठा ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म आणि भारतीयांचा सर्वाधिक पसंतीचा ट्रॅव्हल पार्टनर इझमायट्रिप डॉटकॉम कंपनीकडून फ्लाइट टिकिट्सचे बुकिंग करून गोवा, पुणे आणि दिल्ली विमानतळांवर लँड होणाऱ्या ग्राहकांसाठी लेव्हो स्पॅलॉनचा विलक्षण हवाहवासा अनुभव मिळविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, जिथे कंपनीचा शिक्का असलेल्या व्हाऊचर्सच्या मोबदल्यात ग्राहकांना आपल्या ब्युटी सर्व्हिसेसवर आकर्षक सवलती मिळू शकणार आहेत. ही व्हाऊचर्स वापरून ग्राहकांना या सेवांवर तब्बल १,००० रुपयांची सूट मिळणार आहे.

गोव्यामध्ये येणाऱ्या प्रवाशांना वागाटोर छापोरा रोडवरील डब्ल्यू, गोवा येथे असलेल्या अवे स्पा आणि लेव्हो सॅलॉनमध्ये सौंदर्य आणि दिमाख यांचा स्पर्श अनुभवता येणार आहे. दिल्लीला भेट देणाऱ्या प्रवाशांना पेगॅसस वन, गोल्फ कोर्स रोड, सेक्टर-५३, गुरुग्राम येथील लेव्हो स्पॅलॉनमध्ये ही व्हाऊचर्स वापरता येणार आहेत. त्याचप्रमाणे पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना पुण्यातील कोरेगाव पार्क येथील द वेस्टीन मधील हेवनली स्पा आणि लेव्हो सॅलॉनमधील तज्ज्ञांच्या मदतीने आपल्या व्यक्तिमत्वाला नवी झळाळी देता येणार आहे.

इझमायट्रिपचे सह-संस्थापक रिकांत पिट्टी म्हणाले, ‘ या ऑफरमुळे आमच्यासोबत प्रवास करत असलेल्या प्रवाशांना एक ताजातवाना करणारा अनुभव आम्ही देऊ शकणार आहोत. बहुतांश लोकांना सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी गेले असताना अशा विरंगुळ्याच्या गोष्टींची मौज अनुभवणे आवडते आणि त्यांच्यासाठी असा आगळावेगळा अनुभव घेऊन आल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे.’

‘प्रवास किती थकवणारा असू शकतो हे आपल्या साऱ्यांनाच माहीत आहे आणि ग्राहकांना सर्वात उच्च तऱ्हेची देखभाल पुरविणाऱ्यासाठी आमची ही नवीन ऑफर त्यांना संपूर्ण ताजेतवाने करण्यासाठी आणि ताणतणाव दूर करण्यासाठी एक आलिशान अनुभव घेऊन आली आहे. हा छान सहयोग म्हणजे माझ्यासाठी एक गौरवाची बाब आहे.’ असे लेव्हो सॅलॉनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक प्रणिता बावेजा यांनी सांगितले.