जिम्नॅस्टिक्समध्ये सारा राऊळला सुवर्णपदक

जिम्नॅस्टिक्समधील मुलींच्या सर्वसाधारण क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या सारा राऊळ हिने सोनेरी कामगिरी करताना ३९.३३४ गुण नोंदवले. ती मुंबई येथील खेळाडू असून सध्या ती ठाणे येथे ज्येष्ठ प्रशिक्षक महेंद्र बाभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. तिचीही पहिलीच खेलो इंडिया स्पर्धा आहे. तिची सहकारी रिया केळकर हिला मात्र पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिला ३६.२६६ गुण मिळाले.

‘पदार्पणातील सुवर्णपदकाचा आनंद वेगळाच’ – सारा राऊळ

माझी ही पहिलीच खेलो इंडिया स्पर्धा होती मात्र मी या स्पर्धेसाठी चांगला सराव केला होता आणि सर्वोत्तम कौशल्य दाखवण्याचे माझे ध्येय होते. त्यामुळेच मी कोणतेही दडपण न घेता प्रत्येक प्रकारात 100% कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवाने त्यामध्ये मला यशही मिळाले असे सारा राऊळ हिने सांगितले.

फ्लोअर एक्झरसाईज प्रकारात दवंडे याला रौप्य पदक तर कोठारी याला कांस्यपदक

जिम्नॅस्टिक्समधील मुलांच्या फ्लोअर एक्झरसाईज क्रीडा प्रकारात आर्यन दवंडे या ठाण्याच्या खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना रुपेरी कामगिरी केली. त्याला १२.०३३ गुण मिळाले. त्याचा सहकारी आणि मुंबईचा खेळाडू कोठारी याने या क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकले. त्याला ११.६३३ गुण मिळाले.

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये संयुक्ता काळेची रुपेरी कामगिरी

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ठाण्याची खेळाडू संयुक्ता काळे हिने रिदमिक जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात रुपेरी यश संपादन केले. तिने ९५.२५ गुणांची कमाई केली