मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाचा ‘प्रेरणा पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न !

मुंबई : मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघ संस्थेद्वारे प्रेरणा पुरस्काराचा वितरण सोहळा आज संपन्न झाला. भारतीय संरक्षण आणि सुरक्षा दलातील शूरवीरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. निवृत्त लेफ्टनंट जनरल शैलेश तिनईकर यांच्या हस्ते भारतीय हवाई दलातील निवृत्त ग्रुप कॅप्टन सुहास फाटक, भारतीय लष्कराचे निवृत्त कर्नल बिपिन शिंदे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त जगदीश जाधव यांना प्रेरणा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. तीनही पुरस्कार प्राप्त मान्यवरांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार विनायक परब यांनी घेतली. मुलाखतीमध्ये हवाई दलातील निवृत्त ग्रुप कॅप्टन सुहास फाटक, लष्कराचे निवृत्त कर्नल बिपिन शिंदे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त जगदीश जाधव यांनी देश सेवा करताना आलेले रोमांचकारी अनुभव, राष्ट्रनिष्ठा, गुप्तता, सुरक्षितता, संघर्ष, सामाजिक कार्य आदी प्रसंग आणि घटना अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या. पुरस्कारात मिळालेली राशी तीनही पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी ते सामाजिक कार्य करत असणाऱ्या संस्थांना दिली.

पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे,उपाध्यक्ष सतीश पाटणकर, कार्यवाह जयप्रकाश बर्वे, संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, राष्ट्रीय छात्र सेनेचे शालेय विद्यार्थी, पोलीस, सैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अरुणा अग्निहोत्री यांनी केलं.