बोरिवली क्रीडा महोत्सवात सावरकर आर्चरी अकादमीला १६ सुवर्ण पदके

मुंबई : बोरिवली क्रीडा महोत्सवामध्ये राजामाता जिजाऊ उद्यान येथे १२ फेब्रुवारी २०२३ ला आयोजित केलेल्या तिरंदाजी स्पर्धेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर आर्चरी अकादमीच्या तिरंदाजांनी घवघवीत यश मिळवले. तिरंदाजांनी १६ सुवर्णपदके, ५ रजत पदके आणि ११ कांस्य पदके अशी एकूण ३२ पदके पटकावली.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व तिरंदाजांचे आणि तिरंदाजी अकादमीच्या यशाबद्दल प्रशंसा केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या आर्चरी अकादमीने या स्पर्धेत सर्वात अधिक सुवर्ण पदके पटकावली आहेत, अशी माहिती अकादमीचे प्रशिक्षक स्वप्निल परब यांनी दिली आहे.

● १० वर्षांखालील गट
अदवय अनिकेत सावंत (दोन सुवर्ण), देवांश विवेक मोहिते (दोन कांस्य), शिरिन आशिश पाटील ( दोन सुवर्ण),
● १२ वर्षाखालील गट
स्वरा संदेश परब (एक रजत), सोनम शेलार (एक सुवर्ण), वीर पद्मिनी नायक ( एक सुवर्ण, एक कांस्य),
● १४ वर्षाखालील गट
संकल्प जाधव ( एक सुवर्ण, एक कांस्य), प्रतीक राज (एक कांस्य)
● १७ वर्षाखालील गट
दर्श विजय झारे (दोन सुवर्ण), शर्मिका घाडीगावकर ( दोन सुवर्ण)
● खुला गट
कावेरी नायकर (दोन रजत), श्वेता तिवारी ( एक कांस्य), नेहा टिकम (एक कांस्य)