महाराष्ट्र सर्वाधिक ८ सुवर्ण, ६ रौप्य आणि ७ कांस्य पदकांसह अव्वल स्थानी !

महाराष्ट्राचा संघ खेलो इंडिया युथ गेम्समध्ये तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याच्या दिशेने मार्गक्रमणा करत आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या संघाला तिसऱ्या दिवसअखेर गुरुवारपर्यंत स्पर्धेत सर्वाधिक २१ पदकांची कमाई करता आली. महाराष्ट्राचा संघ पदक तालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाला. महाराष्ट्राने यजमानांपेक्षा दुप्पट पदके जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे. महाराष्ट्राचा संघ ८ सुवर्ण,६ रौप्य आणि ७ कांस्य पदके पटकावत एकूण २१ पदकांसह अव्वल स्थानी राहिला आहे. तसेच ८ सुवर्णांसह यजमान मध्य प्रदेशच्या नावे ११ पदकांची नोंद आहे.

● नेमबाजी :
इशा टाकसाळे (रौप्य)
स्वराज भोंडवे (कांस्य)

● सायकलिंग :
पूजा दानोळे (सुवर्ण)
संज्ञा कोकाटे(सुवर्ण)
ओम कारंडे (कांस्य)

● टीम स्प्रिंट – मुली
अदिती डोंगरे (सुवर्ण)
पूजा दानोळे (सुवर्ण)
संज्ञा कोकाटे (सुवर्ण)

● योगासन :
रुद्राक्षी भावे (सुवर्ण)
निरल वाडेकर (रौप्य),
स्वरा गुजर (कांस्य)
तृप्ती डोंगरे-देवांशी वाकळे (सुवर्ण),
स्वरा गुजर-प्रांजल वहान्न (रौप्य),
सुमित बंडाळे (सुवर्ण)
स्वराज फिस्के (कांस्य)
स्वराज फिस्के (सुवर्ण)
निबोध पाटील (कांस्य)
अंश मयेकर- नानक अभंग (रौप्य)
रुपेश सांघे- सुमित बंडाळे (कांस्य)