मुंबईत पहिली अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय क्रुझ परिषद २०२२ चे आयोजन !

मुंबई : हिंदुस्थान हे नाव सिंधू नदीवरून पडले आहे. देशातील गंगा, यमुना, कावेरी, गोदावरी, कृष्णा या नद्यांचा आपण आदर करतो. २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नदी स्वच्छतेसाठी लक्षणीय प्रयत्न केले. आपल्याकडे नदी सागरी पर्यटनाची क्षमता आहे. प्रत्येक नदीची वेगळी क्षमता आहे. स्टच्यु ऑफ युनिटीला नर्मदा नदीवरून जाऊ शकता. अंदमान हे सिंगापूर होऊ शकतो. लाखो पर्यटक क्रुझने अंदमानला येऊ शकतात. भारत सरकार पर्यटन धोरण आखत आहे. गतिशक्तीद्वारे प्रत्येक क्षेत्रात पर्यटन आणू शकतो. भारतात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. भारत जल पर्यटनाचे केंद्र होण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधेला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जीकिशन रेड्डी यांनी केले. मुंबईत अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय क्रुझ परिषद २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, मंत्रालयाचे सचिव डॉक्टर संजीव रंजन, मुंबई पोर्ट ट्रस्टचे राजीव जलोटा, भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण अध्यक्ष संजय बंडोपाध्याय, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे महासंचालक जी. के. वी. राव आदी होते.

WhatsApp Image 2022 09 30 at 7.04.56 AM

मुंबईत केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय आणि भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ यांनी पहिली अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेचे काल आणि आज आयोजन केले होते. अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय क्रुझ परिषदेत क्रूझ हबचा विकास, धोरण, पायाभूत सुविधा, नदी आणि सागर पर्यटनाची क्षमता, कोरोना काळात तंत्रज्ञानाची भूमिका, यशस्वी कथा (सक्सेस स्टोरी) या मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय आणि भारतीय क्रूझलाइन ऑपरेटर, गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील तज्ञ आणि सल्लागार, केंद्र सरकार, आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, बंदरे, सागरी मंडळे, पर्यटन मंडळांचे अधिकारी आणि प्रतिनिधी यांनी सहभागी होऊन संबंधित विषयावर सादरीकरण केले.

मुंबईत पहिली अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय क्रुझ परिषदेमध्ये अंदमान, लक्षद्वीप, दिव-दमण, छत्तीसगड, बिहार, महाराष्ट्र आदी पर्यटनाची माहिती देणारी दालने होती. देशातील महाराष्ट्र, केरळ, मल्याळम, पंजाब आदी विविध राज्यातील सांस्कृतिक नृत्य सादर करण्यात आले.