मुंबईत बँक ऑफ बडोदा सन रन २.० मध्ये ३ हजार ५०० हून अधिक स्पर्धक!

मुंबई : मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं बँक ऑफ बडोदा सन रन २.०चं जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये आज आयोजन करण्यात आलं होतं. भारताची ऑलिंपिक पदकविजेती बॅडमिंटनपटू आणि बँक ऑफ बडोदाची ब्रँड एंडोर्सर पीव्ही सिंधू, बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक अजय के खुराना, कार्यकारी संचालक देबदत्त चंद, ललित त्यागी आदी मान्यवरांनी बँक ऑफ बडोदा सन रन २.० ला हिरवा झेंडा दाखवला. बँक ऑफ बडोदा सन रन २.० च्या १० किलोमीटर बीओबी प्रो रन आणि ५किलोमीटरची नॉन-टाइम बीओबी फन रनमध्ये ३ हजार ५०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. महिला आणि पुरुष गटात विजेते ठरलेल्या स्पर्धकांना ऑलिंपिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक अजय के खुराना,कार्यकारी संचालक देबदत्त चंद,कार्यकारी संचालक ललित त्यागी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं.

बँक ऑफ बडोदा सन रन २.०च्या ४५ वयोगटात पुरुषांमध्ये सुशांत जेधे आणि महिलांमध्ये प्राजक्ता शिंदे आणि ४५ पेक्षा अधिक असलेल्या वयोगटात पुरुषांमध्ये आरबीएस मोनी आणि महिलांमध्ये डॉ. इंदू टंडन विजेते ठरले. ४५ वयोगटात पुरुषांमध्ये द्वितीय बबन शिंदे, तृतीय देवेंद्र चौधरी आणि महिलांमध्ये द्वितीय अमृता पटेल आणि तृतीय साक्षी जड्याल ठरले. तसंच ४५ पेक्षा अधिक असलेल्या वयोगटात पुरुषांमध्ये द्वितीय समीर मांजरेकर आणि तृतीय शिवानंद शेट्टी आणि महिलांमध्ये द्वितीय प्रतिभा नाडकर आणि तृतीय डी वंदना चंद्रन विजेते ठरले. बँक ऑफ बडोदा सन रन २.० च्या आयोजनात झुंबा सत्र आणि गायक, गीतकार आणि संगीतकार प्रवीर बारोट यांच्या लाईव्ह बँड परफॉर्मन्सचे सादरीकरण करण्यात आलं.