स्टोरीटेलने मराठीतील ५ हजारांहून अधिक सर्वोत्तम पुस्तके ऑडिओ स्वरूपात मोबाईलवर उपलब्ध करून देऊन मराठी भाषा संवर्धनाचे मोठे काम केले आहे. यामुळे मराठी भाषिक आपल्या स्मार्टफोनवर जगात कुठेही, कितीही आणि कधीही मराठी भाषा ऐकू शकतात. आपल्या देशाच्या सीमेवर संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या अनेक महाराष्ट्रीयन सैनिकांनी आम्ही स्टोरीटेलच्या माध्यमातून मराठी भाषा ऐकतो आणि आम्हाला मातृभाषेतून संवाद साधण्याचा आनंद मिळतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
स्टोरीटेल इंडियाचे कंट्री मॅनेजर योगेश दशरथ म्हणाले, ‘९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे करण्यासाठी स्टोरीटेल विशेष योजना घेऊन येत आहोत. अवघ्या पाचशे रुपये वार्षिक वर्गणीत पाच हजारांहून अधिक मराठी ऑडिओबुक्सचा खजिना या दरम्यान साहित्यप्रेमी, दर्दी रसिक अनुभवू शकतील.’स्टोरीटेलवर अनेक भाषांमध्ये तसेच भारतात ११ प्रादेशिक भाषांमध्ये ‘ऑडिओबुक्स उपलब्ध असून वार्षिक वर्गणी ९९९/- आहे. पण साहित्य संमेलनातील स्टाॅलवर वर्गणी भरणाऱ्यांसाठी स्टोरीटेलने ५०% सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.५००/- वार्षिक वर्गणी भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.
डिजिटल तंत्रज्ञानाच्या विकासामुळे माहिती आणि ज्ञानाचा खजिना सर्वांसाठी खुला झाला. सर्वसामान्यांच्या हातात स्मार्टफोन दिसू लागला आणि त्यातून आपल्या मातृभाषेतील साहित्य लोक वाचू, ऐकू आणि पाहू लागले. माहितीच्या या महाजालात मराठी ही जगातील आघाडीची भाषा ठरते आहे, याचे कारण अनेक मराठी रसिक इंटरनेटवर मराठी भाषेचा वापर करू लागले आहेत. स्टोरीटेलने गतवर्षी नाशिक येथे संपन्न झालेल्या साहित्यसंमेलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून साहित्य रसिक श्रोत्यांसोबत संवाद साधला. या खास काळासाठी विशेष सवलत योजना तयार करून रसिकांच्या आवडी निवडींचा धांडोळा घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद घडला. स्टोरीटेल विविध साहित्यकृतींच्या माध्यमातून साहित्यरसिकांसोबत संवाद साधण्यासाठी अनेक उपक्रम राबवित आहे.
साहित्य रसिकांसोबत संवाद साधताना स्टोरीटेल मराठीचे प्रसाद मिरासदार म्हणाले, ‘मराठी भाषिकांनी माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी मराठी भाषेतून आंतरजालातील सर्व व्यवहार केले पाहिजेत. तर मराठी भाषा या नव्या डिजिटल युगात टिकेल, वाढेल एवढेच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर वापरली जाईल. मराठी भाषिक जगातील जवळजवळ सर्व देशांत पसरलेला आहे. परराज्यात किंवा परदेशात मराठी टिकवायची असेल, तर या भाषेत ऐकले किंवा बोलले गेले पाहिजे.’