वर्ष २०२२ मध्ये मुंबईच्या निवासी मागणीत ५२.१ % वाढ

मुंबई : मुंबईच्या निवासी मागणीत ५२.१ टक्क्यांनी वाढ झाली आणि पुरवठा १३.४ टक्क्यांनी आहे, असे मॅजिकब्रिक्सच्या नवीनतम प्रोपइंडेक्स अहवाल ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ मध्ये समोर आले आहे. अहवालात पुढे असे दिसून आले आहे की, शहरातील सरासरी मालमत्तेचा दर वर्षोत्तर ६.१% ने वाढला आहे आणि रेडी टू मूव्ह अपार्टमेंटच्या दरात वर्षोत्तर ७.४% ने वाढ झाली आहे. शिवाय निवासी मागणीत तिमाही आधारित ७.६% आणि पुरवठ्यात तिमाही आधारित ७.२% ने वाढ झाली. परवडणाऱ्या अपार्टमेंटची मागणी सर्वाधिक होती आणि ४४% घर खरेदीदारांनी २ बी.एच.के युनिट्सला प्राधान्य दिले आहे. ज्याची किंमत रुपये १५,०००/- ते २५,०००/- प्रती चौरस फुट दरम्यान आहे.

नवीन लाँचिंगमध्ये वाढ आणि शहर परिसरात बांधकाम सुरू असलेले अनेक प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे बाजारपेठेला चालना मिळाली आणि मागणी वाढली. जानेवारी २०२३ मध्ये मेट्रो मार्ग २ अ आणि ७ चे कामकाज सुरू होणार असल्याने निवासी मागणी आणि पुरवठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मॅजिक ब्रिक्सद्वारे ट्रॅक केलेल्या १२ प्रमुख शहरांमधील निवासी मागणीत १९% वाढ झाली आहे.

‘२०२२ मध्ये निवासी मागणी, पुरवठा आणि किंमती सुधारल्या आणि हे वर्ष बांधकाम सुरू असलेल्या आणि रेडी-टू-मूव्ह-इन दोन्ही प्रकारच्या घरांसाठी चांगले आहे. गेल्या तिमाहींमध्ये रेपो रेट आणि गृहकर्जाच्या दरात सातत्याने वाढ झाली असली, तरी एंड यूजर्स गृहखरेदीसाठी उत्सुक होते. जे विकासकांना त्यांचे विद्यमान प्रकल्प वितरित करताना नवीन प्रकल्प लाँचिंगला गती देण्यासाठी ऊर्जा देत होते. एकूणच आम्ही आशावादी आहोत की २०२३ मध्येही निवासी मागणी मोठ्या प्रमाणात टिकून राहील.’असे मॅजिकब्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर पै यांनी सांगितले.