‘व्यंगचित्रकारांचे बाळासाहेब’ जागतिक व्यंगचित्र प्रदर्शन !

मुंबई : दादर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘व्यंगचित्रकारांचे बाळासाहेब’ जागतिक व्यंगचित्र प्रदर्शन कार्टूनिस्टस् कंबाईन आणि शिवप्रेरणा यांनी आयोजित करण्यात आले होते. २ आणि ३ फेब्रुवारी २०२३ दरम्यान सकाळी १०:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत विनामूल्य व्यंगचित्र प्रदर्शन खुले होते. माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यांनी’व्यंगचित्रकारांचे बाळासाहेब’ जागतिक व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्धघाटन केले. प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे ज्येष्ठ व्यंगचित्रकार, लेखक आणि पर्यावरण तज्ज्ञ आबिद सुरती, आयोजक आणि कार्टूनिस्टस् कंबाईनचे अध्यक्ष व्यंगचित्रकार संजय मेस्त्री, शिवप्रेरणाचे संचालक यशराज नेरकर, व्यंगचित्रकार चारुहास पंडित, व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

‘व्यंगचित्रकारांचे बाळासाहेब’ जागतिक व्यंगचित्र प्रदर्शनात अमेरिका, चीन, पोलंड, युक्रेन, ब्राझील, रुमानिया, इराक अशा जगभरातील देशातून आलेली निवडक व्यंगचित्रे होती. तसेच महाराष्ट्रासह बंगाल, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश आदी राज्यातून दर्जेदार आणि दुर्मिळ व्यंगचित्रे प्रदर्शनात चित्रकार आणि नागरिकांना पाहता आली.