स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव  खासदार अनिल देसाई !

मुंबई : स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव  खासदार अनिल देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेची स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ ही अंगिकृत संघटना आहे. ‘ स्थानीय लोकाधिकार समितीचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे, ते पुढं चालू ठेवत राहायचं आहे. त्यासाठी जेवढं श्रम लागणार आहे, ते कमीच पडणार आहे. सातत्य आणि मेहनत करून ही चळवळ पुढं न्यायाची आहे, ‘ अशी प्रतिक्रिया खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.

शिवसेना नेते लोकसभा खासदार गजानन कीर्तिकर हे स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळं  शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळं त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.  स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव  खासदार अनिल देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.