पुणे: राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे उद्धघाटन करण्यात आले. यादरम्यान यावेळी शिवकालीन लोक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘शिवकालिन गाव’चे उद्धघाटन करण्यात आले. यादरम्यान पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याठिकाणी भेट दिली. यादरम्यान त्यांनी शिवकालीन बाजारपेठेतून टोपली खरेदी केली. तसेच तरपा नृत्यामध्ये वाद्य हाती घेत स्वत: फेर धरत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्याला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली.
यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक बी.एन. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उप विभागीय अधिकारी सारंग कोडेलकर, पर्यटन सहसंचालक सुप्रिया करमरकर-दातार, जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके आदी उपस्थित होते.
पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सुरुवातीला जुन्नरमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळ महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. ‘शिवजन्मभूमी जुन्नर’ या सेल्फी पॉईंटचेही यावेळी उद्धघाटन करण्यात आले.
शिवकालीन बाजापेठ ठरतेय लक्षवेधी : शिवकालीन लोक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘शिवकालिन गाव’चे उद्धघाटन करण्यात आले. यामध्ये तत्कालीन गवताची घरे, लोहारकाम, कैकाडी, कुंभारकाम आदी व्यवसाय, आदिवासी तरपा नृत्य, वासुदेव, गोंधळी परंपरा, दांडपट्टा, तलवारबाजी आदी मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. या गावामध्ये बनविण्यात आलेली शिवकालीन बाजारपेठ आकर्षण उपस्थितांचे आकर्षण बनून राहिली. यामध्ये मंत्री लोढा यांनी बांबूची टोपली खरेदी केली. यावेळी तसेच http://www.hindaviswarajya.info/ या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आदिवासी तरपा नृत्यामध्ये वाद्य हाती घेत फेर धरला. यानंतर मंत्री लोढा यांनी शरद बुट्टे पाटील क्रीडांगण येथे बचत गट प्रदर्शन, महाशिवआरती कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणी भेट दिली.
विश्वविक्रमी ११हजार शिवभक्तांच्या उपस्थितीत महाआरतीने उजळला शिवनेरी गड
महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाआरतीला राज्यातील ११ हजार शिवभक्तांनी उपस्थिती दर्शवत विश्वविक्रमाला गवसणी घातली. महिला आणि बालविकास, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत महाआरती सोहळा पार पडला. याप्रसंगी हभप पंकज महाराज गावडे, आशा बचके, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते. जगाचे श्रद्धास्थान मानला जाणाऱ्या शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या महाआरतीचा विश्वविक्रम घडला आहे. महाराष्ट्रातील शिवप्रेमी विक्रमी संख्येत या महाआरती सोहळ्यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या विक्रमाची नोंद घेण्यासाठी लिमका बुक ऑफ रेकॉर्डचे आधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभागाने पहिल्यांदाच महाआरतीचे आयोजन केले होते. या सोहळ्याला महाराष्ट्रातील शिवभक्तांनी विक्रमी संख्येत हजेरी लावून विश्वविक्रम नोंदवला आहे.