भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जाण्यानं एका युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त केली गेली, ते खरंच आहे. ‘लता मंगेशकर’ हे सात अक्षरी स्वरवलय लौकीकार्थानं एक वर्षापूर्वी अंतर्धान पावलं तेव्हा एका गायिकेचा नव्हे, ‘युगाचा अस्त’ झाल्याची सार्वत्रिक भावना प्रकट झाली. खरोखर एक युग समाप्त झाल्याचीच जाणीव होती ती. आज लतादीदींची पहिली पुण्यतिथी. त्यानिमित्तानं लतादीदी गेल्या तेव्हा दूरचित्रवाणीवरची (टि.व्ही.) अंतयात्रा पाहताना लतादीदींबद्दल थोर व्यक्ती काय म्हणाल्या हे जाणून घेणारा प्रसाद मिरासदार यांनी लिहिलेला अनुभव ‘विश्वाचे आर्त लतादीदी’ या ऑडिओ कथानाद्वारे स्टोरीटेल मराठीवर प्रकाशित आहे. आज त्यांच्या स्मृती जागवताना ही भावांजली ऐकावी असे आवाहन स्टोरीटेल मराठीने केले आहे.
फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला आपल्या स्वरांनी व्यापून टाकणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी समजली आणि नकळत दूरचित्रवाणी लावली गेली. संपूर्ण भारतावर शोककळा पसरली होती. जग जणू काही काळासाठी स्तब्ध झाल्यासारखे वाटत होते. लतादीदींच्या स्वरातील गाणी दूरचित्रवाणीवर एका मागोमाग एक लावली जात होती.मधूनच त्यांच्या सुहृदांच्या आठवणी जागवल्या जात होत्या. संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेला तो स्वर असा सातत्याने ऐकताना एकच भाव मनात येत होता तो म्हणजे आर्तता..! लतादीदींच्या जाण्याने निर्माण झालेल्या दुःखासोबतच त्यांच्या स्वरांनी मनात जागृत झालेल्या करूणेचा अनुभव विलक्षण होता आणि ही करूणा सर्वांच्या मनात सातत्याने राहो हीच प्रार्थना पुन्हा पुन्हा मनात येत होती. हा एक विलक्षण अनुभव होता!
‘विश्वाचे आर्त लतादीदी’ हे स्टोरीटेल मराठीवरील ऑडिओकथन रसिका कुलकर्णी यांच्या आवाजात असून ६ फेब्रुवारी २०२२ या दिवसातील आर्तता आपल्या समृद्ध लेखनातून प्रख्यात लेखक प्रसाद मिरासदार यांनी दीदींच्या चाहत्यांसाठी शब्दबद्ध केली आहे. ‘विश्वाचे आर्त मध्ये लतादिदींच्या स्मृतिदिनी त्यांच्या बद्दल भालजी पेंढारकरांपासून कुमार गंधर्वांपर्यत आणि पु.ल.देशपांडेंपासून नौशादपर्यंत अनेकांनी काढलेले गौरवोद्गार ऐका फक्त स्टोरीटेलवर!
‘विश्वाचे आर्त लतादीदी’ हे स्टोरीटेल मराठीवरील ऑडिओकथन ऐकण्यासाठील लिंक
https://www.storytel.com/in/en/books/vishwache-art-latadidi-1573231?appRedirect=true