मुंबई : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्यानं बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथं भाजप युवा मोर्चाच्या वतीनं खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वात आज मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. ५ किमी मॅरेथॉनमध्ये ४६५ युवक युवती स्पर्धक सहभागी झाले होते.
खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते प्रत्येक स्पर्धकाला युवा दिवस टी-शर्ट, प्रमाणपत्र आणि पदक देण्यात आलं. यावेळी आमदार मनिषा चौधरी, भाजप उत्तर मुंबई अध्यक्ष गणेश खणकर, भाजप उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, माजी नगरसेविका लीना दहेरकर, आयोजक अमर शाह आदी उपस्थित होते.