‘स्वाधार’च्या रेज ऑफ होप प्रकल्पाची झाली वीस वर्षे पूर्ण…

पुणे: एचआयव्ही (HIV) बरोबर झगडणाऱ्या मुलांचा आशेचा किरण आहे ‘स्वाधार’चा रेज ऑफ होप प्रकल्प. स्वर्गीय मृणाल गोरे आणि मीनाक्षी आपटे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली स्वाधार ही संस्था एचआयव्ही बाधित मुलांच्या पुनर्वसनाचे काम करते आहे, स्वाधार संस्थेचे एकूण सध्या १२ प्रकल्प चालू आहेत.

स्वाधार संस्थेचा रेज ऑफ होप (Rays of Hope) प्रकल्प गेली २० वर्षे वंचित वर्गातील एचआयव्ही (HIV) बाधित/प्रभावित मुलांसाठी कार्यरत आहे. एचआयव्ही (HIV) बाधित (infected ) आणि एचआयव्ही (HIV) प्रभावित (पालक infected पण मुले HIV negative) दोन्ही प्रकारच्या मुलांचा यात समावेश असतो. एचआयव्हीसह (HIV) जगणा‍‍र्‍या मुलांमध्ये कुपोषण व संधिसाधू आजाराला बळी पडण्याचे प्रमाण लक्षणीय असते. शिवाय कुपोषणामुळे शैक्षणिक प्रगती खुंटते. मुलांची शाळेतून गळती होते.

ह्या दुष्ट चक्रातून मुलांना बाहेर काढण्याचा उपाय म्हणजे एआरटी (ART – Antivretroviral Therapy) जी बाधित मुलांना दिली जाते) बरोबरच प्रथिनयुक्त आहार सगळ्या लाभार्थींना देणे. रेज ऑफ होप दर महिन्याला योग्य आहार पुरविते. जेणेकरून ती शिक्षण पुरे करून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील, कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकतील. ह्यासाठी सर्वतोपरी अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण याची मदत केली जाते. ह्या सर्व प्रयत्नातून आजपर्यंत रेज ऑफ होपने १ लाख ७२ हजार ८०० लाभार्थींना याचा लाभ मिळवून दिलेला आहे.एचआयव्ही पॉझिटिव्हचे निदान झाल्यानंतर ही मुले कौशल्य अधिष्ठित प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर आज उभी आहेत. काही जणांचा अंत होतो,तर तर काहीजण अशा अवस्थेतही आपले संसार थाटतात, संस्था त्यांना त्यासाठी मदतही करते. हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे.संसार थाटल्यानंतर काही लाभार्थींना औषध उपचार घेऊन निगेटिव्ह अपत्य झालेली आहेत. हे पण एक आश्चर्यच.

सामाजिक जाणीवेची सत्र, दैनंदिन जीवनातील जगण्याची उर्मी, तसंच जगण्यासाठी उपयुक्त कौशल्य, तसेच रंजन आणि प्रबोधन यासाठी वेगवेगळ्या नामांकित तज्ञांकडून त्यांना प्रशिक्षित केले जाते. अशा या राष्ट्रीय आपत्तीला गेला वीस वर्षे पासून सामोरे जाऊन रेज ऑफ होपने अशा प्रकारच्या आजारग्रस्त मुलांना आनंदाने जगण्यासाठी उभे केले आहे.

प्रकल्प प्रमुख सुनंदा टिल्लू यांच्या देखरेखे खाली उषा देशपांडे, आशा सगर, ज्योती जगताप, मंगल बागल , अनन्या नवार स्नेहा बाविस्कर यांच्या सहकार्याने सदर रेज ऑफ होप हा प्रकल्प विसाव्या वर्षे २६ जुलै २०२५ल पूर्ण करीत आहे. यानिमित्ताने डॉ. संजय मेहंदळे( संचालक, संशोधक, हिंदुजा हॉस्पिटल मुंबई )यांच्या सन्माननीय उपस्थितीत सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान आणि लाभार्थ्यांचा स्नेह मेळावा गणेश सभागृह पुणे होत आहे . या निमित्ताने कुठल्याही हितचिंतक आणि देणगीदारांना काही मदत करायची असेल त्या संदर्भात संस्थेने आवाहन केले आहे.

संपर्कासाठी :
रेज ऑफ होप,पुणे (ROH, PUNE)
८३९००८३५९६
रेज ऑफ होप,पिंपरी चिंचवड महानगरपालिका (ROH,PCMC)
९८३८०२७८४