शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळवून त्यांना सक्षम केल्यास त्यांच्या आत्महत्या रोखण्यावर उपाययोजना करता येतील. ‘उपचारापेक्षा प्रतिबंध महत्वाचा’ हा दृष्टीकोन असावा. अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांचा निर्माता प्रतिष्ठेने सक्षम झाला पाहिजे. प्रत्येक शेतकरी राष्ट्रासाठी महत्वाचा आहे, प्रत्येकाने त्याला सक्षम करणे हे दायित्व आहे, ही संवेदना प्रत्येकामध्ये रुजली. तर शेतकरी आत्मसन्मानाने जगेल.
शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळवून त्यांना सक्षम केल्यास त्यांच्या आत्महत्या रोखण्यावर उपाययोजना करता येतील. ‘उपचारापेक्षा प्रतिबंध महत्वाचा’ हा दृष्टीकोन असावा. अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांचा निर्माता प्रतिष्ठेने सक्षम झाला, तर तो आत्महत्या का करेल? शेती विषयक यशस्वी प्रयोग आणि त्या प्रयोगाचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्याला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक शेतकरी राष्ट्रासाठी महत्वाचा आहे, प्रत्येकाने त्याला सक्षम करणे हे दायित्व आहे, ही संवेदना प्रत्येकामध्ये रुजली. तर शेतकरी आत्मसन्मानाने जगेल.
शेती क्षेत्रातील संशोधन, सेंद्रिय पद्धती, शेतकऱ्यांची आर्थिक साक्षरता, शेती क्षेत्रातील उत्पादन ते ग्राहकापर्यंतची सुनियोजित साखळी, वाजवी व्याजासह वित्तपुरवठा, पायाभूत सुविधा, शेतमालाला योग्य भाव, शासकीय नियमांची योग्य अंमलबजावणी, दलालांचा हस्तक्षेप आणि पिळवणूकीवर टाच आली, तर आत्महत्याच्या जागी शेतकऱ्याचा ‘आत्मउद्धार’ होईल. ज्या शेतकऱ्यांनी शेतीतले प्रयोग यशस्वी केले, अशांचे गट नेमून जे शेतकरी शेती करण्यास संघर्ष करत आहेत. त्यांना मार्गदर्शन करून सहाय्य करणे, हे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पारंपारिक शेतीची चौकट मोडून नवीन-वेगळे प्रयोग आणि संशोधन आवश्यक आहे.
आत्महत्या मागची मूळ कारणे शोधून त्यावर ठोस अशा वास्तव उपायांची अंमबजावणी करणे महत्वाचे आहे. शेतकऱ्याला समजून-समुपदेशन करणे आणि त्याच्या समस्येने निराकरण करणे आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे उत्पादन सरकारने विकत घेतले आणि त्यानंतर ते शासनाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचले. तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता येतील, असे वाटते.