मुंबई:’गीतरामायण’म्हणजे प्रभू श्रीरामाचे भूतलावरील अवतारकार्य उलगडून दाखविणारी अजरामर कलाकृती! महाराष्ट्र वाल्मिकी ग. दि. माडगूळकर विरचित आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतरामायणाची मोहिनी आजही कायम आहे. श्रीराम नवमीच्या निमित्ताने पुन्हा एकदा रामभक्तांना आणि रसिकांना ही अजरामर कलाकृती अनुभवता येणार आहे. शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने रामनवमीच्या पूर्वसंध्येला बुधवार दिनांक २९ मार्च २०२३ ला प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात गीतरामायणाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ संगीतकार श्रीधर सुधीर फडके यांच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका रवींद्र नाट्य मंदिर आणि शिवाजी मंदिर येथे उपलब्ध असून बुधवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर रसिकांना रवींद्र नाट्य मंदिरात प्रवेश दिला जाईल.
‘प्रभू श्रीरामाच्या पराक्रमाची, त्यागाची आणि अद्भुत अवतार कार्याची महती सांगणाऱ्या ‘गीतरामायणा’च्या आयोजनातून प्रभू श्रीरामाला वंदन करण्याचा आमचा मानस आहे.रामनवमीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने रामजन्मोत्सवाची मंगलमय सुरुवात होईल .’
– खासदार राहुल रमेश शेवाळे