मुंबई : मेलोरा या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या डी२सी ब्रॅण्डने त्यांचे अक्षय्य तृतीया कलेक्शन लॉन्च केले आहे. मेलोराच्या मालकीच्या डिझायनिंग तंत्राचा वापर करून तयार केलेल्या ३५० हून अधिक सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचा समावेश असलेली आभूषणे भरीव दिसतात आणि तरीही ते कमी वजनाचे व किफायतशीर आहेत.
३,००० रूपयांपासून सुरू होणारे दागिने आणि या कलेक्शनमधील ७० टक्के आभूषणांची किंमत ५०,००० रूपयांहून कमी असण्यासह मेलोरा हा आधुनिक ट्रेण्ड्स आणि स्टाइल्सचा समावेश करत बीआय-हॉलमार्क सोने व प्रमाणित हिऱ्याचे दागिने ऑफर करणारा सर्वात किफायतशीर ज्वेलरी ब्रॅण्ड आहे. या कलेक्शनचा देशातील प्रत्येक महिला आणि पुरूषाला खिशावर अधिक भार न पडता या शुभप्रसंगी सोने खरेदी करण्यास मदत करण्याचा मनसुबा आहे.
मेलोराच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सरोजा येरामिल्ली म्हणाल्या, ‘अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सर्व कुटुंबं संपत्ती देवतेची पूजा करतात. मेलोरामध्ये आम्हाला सणाचे महत्त्व माहित आहे आणि आमचा दृढ विश्वास आहे की, पैशामुळे सण आणि सेलिब्रेशनमध्ये अडथळा येऊ नये. आम्ही अक्षय्य तृतीयेसाठी ५ ट्रेण्डी कलेक्शन्स, ३५० हून अधिक सोने आणि हिऱ्यांचे दागिने लॉन्च केले आहेत. आमचे अद्वितीय डिझाइन तंत्र आम्हाला ज्वेलरी सेट्स ऑफर करण्यास मदत करते, जे विपुल दिसण्यासोबत अत्यंत किफायतशीर आणि उच्च दर्जा व शुद्धतेचे आहेत. यंदा अक्षय्य तृतीयेला आमच्याकडून ग्राहकांसाठी ही भेट आहे.’
मेलोरो दैनंदिन वजनाने हलक्या दागिन्यांमध्ये विशेषीकृत आहे आणि महिलांसाठी १६,००० हून अधिक डिझाइन्स, तर पुरूषांसाठी १०० हून अधिक डिझाइन्स ऑफर करते. ब्रॅण्ड आपल्याा डिझाइन्सना अद्ययावत ठेवण्यासाठी दर शुक्रवारी ७५ नवीन स्टाइल्स सादर करते. मेलोराचे देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये २४ एक्स्पेरिअन्स सेंटर्स आहेत आणि भारत, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंग्डम आणि युरोप येथील २६,००० ठिकाणी सुविधा देते.
नवनवीन डिझाइन्स आणि परवडणारी किंमत (बहुतांश मागणी २० ते ५० हजार किंमतीच्या रेंजमध्ये) यामुळे ब्रॅण्डने गेल्या वर्षभरात झपाट्याने प्रगती केली आहे आणि हा प्रवास पुढे देखील सुरू राहण्याची अपेक्षा आहे. याचा १०,००० पेक्षा कमी निवासी असण्यापासून १ दशलक्षहून अधिक लोक असलेले ३,००० हून अधिक शहरे, नगर आणि गावांवर लक्षणीय परिणाम झाला आहे. मेलोराने आता एआरआर १०० दशलक्ष डॉलर्सची नोंद केली आहे आणि ५ वर्षांमध्ये विक्रीमधून १ बिलियन डॉलर्स संपादित करण्याची योजना आहे.