मुंबई : एएसएल (अॅडव्हेण्टम स्टुडण्ट लिव्हिंग) या युनिअॅको, युनिक्रेड्स आणि युनिस्कॉलर्स या ब्रॅण्ड्सची मालकी असलेल्या आघाडीच्या स्टडी-अब्रॉड (परदेशातील शिक्षण) प्लॅटफॉर्मने नवीन गुंतवणूकदार कॉर्नरस्टोन व्हेंचर्सच्या (सीएसव्हीपी फंड) नेतृत्वाखाली झालेल्या ब्रिज इक्विटी फेरीतून ५ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला आहे. कंपनीच्या २० दशलक्ष डॉलर्सच्या प्रस्तावित सीरिज बी फेरीला जोडणारा पूल म्हणून झालेल्या फेरीत कंपनीच्या पूर्वीच्या गुंतवणूकदारांनीही भाग घेतला. आंतरराष्ट्रीय कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांकरता अर्ज ते निवासापर्यंतच्या सर्व प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने उत्पादन समूह वाढवण्यासाठी हा निधी उपयोगात आणला जाईल.
एएसएल हा एक एकात्मिक विद्यार्थी जीवनचक्र व्यवस्थापन प्लॅटफॉर्म असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्ज ते निवास या प्रवासात डिजिटलकेंद्री दृष्टिकोन ठेवून मदत करतो. आजच्या तारखेपर्यंत ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या प्लॅटफॉर्मचा लाभ घेतला आहे.
या नवीन गुंतवणूकीमुळे एएसएलला विद्यार्थी जीवनचक्राचा कायापालट करण्याच्या उद्दिष्टाने सातत्याने काम करता येईल. तसेच विद्यार्थी, विद्यापीठे, शिक्षणसंस्था आणि प्रशासकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या उत्पादनांचा विस्तार करता येईल. कंपनीचे स्थान भक्कम करण्यासाठी तसेच यूके, युरोपीय संघ, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांसारख्या महत्त्वपूर्ण भौगोलिक प्रदेशांमध्ये सखोल सहयोग निर्माण करण्यासाठी ही गुंतवणूक उपयोगात आणली जाणार आहे.
एएसएलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सिंग यांनी सांगितले की, ‘कोविड-१९ साथीमुळे आर्थिक आव्हाने निर्माण होऊनही तसेच आमच्या प्रतिस्पर्धी कंपन्या टिकाव धरण्यासाठी संघर्ष करत असतानाही, बाजारातील चढउतारांमध्ये आमचा व्यवसाय वाढला आहे आणि तेव्हापासून आम्ही गेल्या वर्षाच्या तुलनेत ३०० एवढी भरीव वाढ साध्य केली आहे. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा प्रवास एकात्मिक करत राहू आणि आमचा उत्पादन पोर्टफोलिओ सर्व भौगोलिक प्रदेशांमध्ये मजबूत करत राहू.’
‘बाजारातील अनिश्चिततेच्या कालावधीत आमच्या पूर्वीपासूनच्या तसेच नवीन गुंतवणूकदारांनी आमच्यावर खूप विश्वास टाकला. विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजांसोबत उत्क्रांत होऊन त्यांना अखंडित अनुभव देण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यास आम्ही बांधील आहोत. आमचा प्राथमिक भर आता नफा कमावण्यावर तसेच या तिन्ही ब्रॅण्ड्सच्या नैसर्गिक वाढीवर राहील,’ असे एएसएलचे सहसंस्थापक सयंतन बिस्वास म्हणाले.