मुंबई : फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने ग्राहकांच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ४६.६ टक्के एवढी भरीव वाढ साध्य केली आहे. त्यामुळे कंपनीची ग्राहक संख्या एप्रिल २०२३ मध्ये १४.१३ दशलक्षांवर पोहोचली आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यातच ०.३८ दशलक्ष नवीन ग्राहक संख्या केली आहेत.
फिनटेक उद्योगात सातत्याने लक्षणीय कामगिरी केल्यामुळे एंजल वनची एकंदर सरासरी दैनंदिन उलाढाल २१.९८ ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १३१.९ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल २०२३ मध्ये कंपनीने ६८.२८ दशलक्ष ऑर्डर्सवर प्रक्रिया केली आणि सरासरी ग्राहक कर्जवितरण पुस्तिकेत १०.९९ अब्ज रुपयांची नोंद झाली. कंपनीचा रिटेल बाजारपेठेतील वाटा मागील वर्षाच्या तुलनेत २४५ बीपीएसने वाढून २३.८ टक्के झाला.
एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी म्हणाले, “एंजल वनची वाढती ग्राहकसंख्या आणि स्थिर व्यावसायिक आकडेवारी यातून, ग्राहकांना अनेविध गुंतवणूक संधी अखंडितपणे उपलब्ध करून देतानाच, त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमताही देण्यातील आमचे यश दिसून येते. आमची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना त्यांच्या संपदासंचय प्रवासात मदत करण्यासाठी तंत्रज्ञानात्मक क्षमता विस्तारण्याचा आमचा प्रयत्न आहे.“
एंजल वन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश ठक्कर यांनी सांगितले, ‘वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाने विकसित केलेल्या आमच्या तंत्रज्ञानाधारित गुंतवणूक सोल्यूशन्सचे यश आमच्या स्थिर कामगिरीतून दिसून येते. आम्ही नुकतेच सुपर अॅप सुरू केले आहे. सुरळीत आणि पारदर्शक गुंतवणूक अनुभव पुरवण्याच्या आमच्या उद्दिष्टाशी हे अॅप सुसंगत आहे. श्रेणी २, ३ शहरांत आणि त्यापलीकडे राहणाऱ्या ग्राहकांना भांडवल बाजारातील उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यायोगे माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय करण्यास आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास त्यांना सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेत अधिक खोलवर पोहोचण्यास आम्ही उत्सुक आहोत.’