मुंबई : इझमायट्रिपडॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन टेक ट्रॅव्हल व्यासपीठाने पटना आणि बिहार येथे त्यांच्या पहिल्या ऑफलाइन रिटेल स्टोअरचे उद्घघाटन करण्यात आले आहे. हे धोरणात्मक पाऊल कंपनीच्या विस्तारीकरण योजनांशी संलग्न आहे आणि ‘मीट अॅण्ड ग्रीट’ प्रकारचा अनुभव पसंत करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याचा मनसुबा आहे.
इझमायट्रिपचे सह-संस्थापक रिकांत पिट्टी म्हणाले, ‘आम्हाला पटनामध्ये आमच्या पहिल्या स्टोअरचे अधिकृतरित्या उद्घघाटन करताना आनंद होत आहे. आमचा आमच्या फ्रँचायझी मॉडेलच्या माध्यमातून भारतभरात प्रबळ उपस्थिती निर्माण करण्याचा मनसुबा आहे. भारतीय बाजारपेठेत उपस्थिती विस्तारित करण्याच्या दीर्घकालीन ध्येयामधील हे लक्षणीय पाऊल आहे.’
ब्रॅण्ड आपली उपस्थिती वाढवण्यासोबत आपल्या कार्यसंचालनांमध्ये वाढ करण्यास उत्सुक असताना पटनामधील फ्रझर रोड येथील महाराजा कामेश्वर कॉम्प्लेक्सच्या प्रमुख ठिकाणी नवीन कार्यालयाचे उद्घघाटन करण्यात आले आहे. ग्राहकांचे ब्रॅण्डकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ब्रॅण्ड कलर्ससह आधुनिक डिझाइन्स लक्षात घेत स्टोअर इंटीरिअर डिझाइन करण्यात आले आहे. हे स्टोअर मार्की सेवा देईल, जसे फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग्ज, बस, ट्रेन व ग्रुप फेअर तिकिटे खरेदी करणे आणि हॉलिडे, क्रूझ व चार्टर पॅकेजेसचा लाभ घेणे. इझमायट्रिपच्या पटनामधील स्टोअरकडून व्हिसा अॅप्लिकेशनच्या अतिरिक्त सेवा आणि संबंधित औपचारिकता देखील प्रदान करण्यात येतील.
या वर्षाच्या सुरूवातीला कंपनीने भारतात त्यांच्या प्रमुख फ्रँचायझी व्यवसायांतर्गत ऑफलाइन रिटेल स्टोअर्स स्थापित करण्याची घोषणा केली. पटनामधील हे स्टोअर लाँच या धोरणाचा भाग आहे आणि कंपनीला ग्राहकांना इन-स्टोअर रिटेल अनुभव मिळण्याची संधी देण्यास साह्य करेल.