पुणे : गाव, खेडे,वस्त्या आणि शहरातील उपनगर यातील गरजू आणि वंचित मुलांसाठी नाटकातून क्षमता विकसन आणि विशेष कौशल्य मिळवण्याच्या या हेतूने प्रा. देवदत्त पाठक आणि नाट्य प्रशिक्षक मिलिंद केळकर आणि गुफानची टीम १०एप्रिल पासून महाराष्ट्र भर फिरत आहे. एचआयव्ही (HIV) पॉझिटीव्ह रस्त्यावरची मुलं, अनाथ,वंचित, गरजू मुलांसाठी या कार्यशाळा होत आहेत.
जे बालनाटयाकडे पोहचू शकत नाहीत, अशा मुलांना रंगमंचीय खेळ आणि रंगभूमी पाठ,सरावाचे तंत्र यातून वेगवेगळ्या त्यांच्याच अनुभव विश्वावर आधारीत छोटे नाट्यप्रयोग करायला संधी मिळत आहे. बाल रंगभूमी गावागावात पोहचावी यासाठी प्रा. देवदत्त पाठक, मिलिंद केळकर आणि गुफानची टीम उन्हाळ्याच्या सुट्टीत मोफत कार्यरत आहे. उरळी कांचन, आंबेगाव, कात्रज,मांजरी, ठाणे, नाशिक, मुंबई,नारायणगाव अशा अनेक ठिकाणी बाल रंगभूमी प्रसाराचे काम होण्यासाठी स्थानिक रंगकर्मींना सहभागी करुन घेतलं जात आहे.