मुंबई : फिजिक्सवाला (पीड्ब्ल्यू) या भारताच्या आघाडीच्या एज्युटेक प्लॅटफॉर्मने पीडब्ल्यू इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन (पीडब्ल्यू आयओआय) या कॉम्प्युटर सायन्स आणि एआयच्या क्षेत्रातील ४ वर्षीय निवासी अभ्यासक्रमाची घोषणा केली आहे. भारतीय सॉफ्टवेअर उद्योगाला भेडसावणाऱ्या विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी याची स्थापना भारताच्या सिलिकॉन व्हॅली म्हणजे बंगळुरूमध्ये करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना औद्योगिक सुसंगत कौशल्ये देऊन आणि व्यावसायिकांच्या मागणी आणि पुरवठ्यातील अंतर व रोजगार क्षमता अंतर साधण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
हा चार वर्षीय पूर्णपणे निवासी अभ्यासक्रम शिक्षणाप्रति एक खास आणि सर्वांगीण दृष्टीकोन देतो. अनुभवी शिक्षकवर्ग तसेच सर्वोच्च कंपन्यांमधील नेते प्रशिक्षक म्हणून असलेल्या, उद्योगाधारित अभ्यासक्रम, १०० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि खऱ्या जगातील प्रकल्प यांनी युक्त या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक प्रवासात यशस्वी होण्यासाठी सज्ज केले जाते. वैयक्तिक मार्गदर्शन, चार सर्वांगीण इंटर्नशिप्स, नेटवर्किंगच्या संधी, जागतिक संधी आणि अद्ययावत कॅम्पसमुळे उपक्रमाचा प्रभाव जास्त वाढतो.
पीडब्ल्यूचे सीआयओ आणि पीडब्ल्यू आयओआयचे अध्यक्ष विश्व मोहन म्हणाले की, ‘भारतीय सॉफ्टवेअर उद्योगात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली असतानाही भारतीय अभियांत्रिकी पदवीधारकांची रोजगार क्षमता तुलनेने कमी आहे आणि मागील काही वर्षांत अत्यंत कमी वाढ झालेली आहे, ही गोष्ट चिंताजनक आहे. त्याचबरोबर कौशल्याधारित एआय आणि डेटा विज्ञान व्यावसायिकांच्या मागणी पुरवठा दरीत खूप मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे शैक्षणिक दृष्टीकोनात व्यापक बदल घडवून आणण्याची गरज दिसून येते. पीडब्ल्यू आयओआयकडून या समस्येवर व्यावसायिकांना वेगाने वाढणाऱ्या नोकऱ्यांच्या बाजारपेठेत रोजगारक्षम आणि प्रभावी कौशल्यांद्वारे सक्षम करून उपाय काढला जातो.
या अभ्यासक्रमाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, ती आजच्या बदलत्या बाजारपेठांमध्ये तंत्रज्ञानाच्या प्रवाहाशी जोडली गेली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना त्याचवेळी प्रतिष्ठित संस्थेतून बॅचलरची पदवीही घेता येते. या पदवीमुळे विद्यार्थी भारतात किंवा परदेशात शिक्षण घेण्याच्या संधी मिळवू शकतात आणि ते स्पर्धा परीक्षा देण्यासाठीही पात्र ठरतात.