मुंबई: इझमायट्रिप या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक व्यासपीठाने भारतातील आघाडीची आणि एकमेव ऑल-इलेक्ट्रिक राइड-हेलिंग सर्विस व ईव्ही चार्जिंग सुपरहब ऑपरेटर ब्लूस्मार्टसोबत त्यांच्या कॅब सेवांसाठी सहयोगाची घोषणा केली आहे. इझमायट्रिप आता या सहयोगासह कॅब्सच्या विद्यमान लाइनअपमध्ये पर्यावरणास अनुकूल ताफा प्रदान करेल. या सहयोगाचा सर्व इझमायट्रिप ग्राहकांना शाश्वत प्रवास सोल्यूशन्स प्रदान करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे हा हरित गतीशीलता क्षेत्रातील मोठा टप्पा आहे.
या सहयोगाचा भाग म्हणून इझमायट्रिप ग्राहक आता इझमायट्रिप वेबसाइटच्या माध्यमातून दिल्ली-एनसीआर आणि बेंगळुरूमधील ब्लूस्मार्ट इलेक्ट्रिक वेईकल्सच्या (ईव्ही ) ताफ्यासह सोईस्करपणे विमानतळापर्यंतचा प्रवास बुक करू शकतात. शाश्वततेप्रती आपल्या कटिबद्धतेसाठी प्रसिद्ध इझमायट्रिपने आपल्या ट्रॅव्हल ऑफरिंग्जीमध्ये ब्लूस्मार्टच्या ईव्हीचा समावेश करत हरित, विश्वसनीय आणि शाश्वत राइड-हेलिंग पर्याय प्रदान करण्याप्रती मोठे पाऊल उचलले आहे.
१०० टक्के इलेक्ट्रिक, शाश्वत, कार्यक्षम आणि किफायतशीर गतीशीलता सोल्यू्शन्सच्या माध्यमातून भारतातील प्रमुख शहरांचे डिकार्बानाइज करण्यातचा ब्लूस्मार्टचा मुख्य उद्देश आहे. २०१९ पासून इलेक्ट्रिक वेईकल्सच्या माध्यमातून २५० दशलक्षहून अधिक अंतर पार करण्यासह आणि ७.५ दशलक्षहून अधिक ट्रिप्सशच्याच सेवा देण्यासह ब्लूस्मार्टने ईव्ही गतीशीलता क्षेत्रामध्ये अग्रणी म्हणून स्वत:चे स्थान स्थापित केले आहे.
इझमायट्रिपचे सह-संस्थाेपक रिकांत पिट्टी म्हणाले, ‘इझमायट्रिपमध्ये आमचा प्रवासाप्रती शाश्वत आणि जबाबदार दृष्टिकोनावर विश्वास आहे. ब्लूस्मार्टसोबतचा आमचा सहयोग पर्यावरणास अनुकूल परिवहन सोल्यूशन्सना चालना देण्याप्रती आमच्या कटिबद्धतेशी परिपूर्णपणे संलग्न आहे. आमच्या ट्रॅव्हरल ऑफरिंग्जमध्ये त्यांचा ताफा समाविष्ट करत आमचा कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबत शाश्वत प्रभाव निर्माण करण्याचा, तसेच ग्राहकांना पर्यावरणास अनुकूल ट्रॅव्हरल पर्याय देण्याचा मनसुबा आहे.’
ब्लूस्मार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक अनमोल सिंग जग्गी यांनी सांगितले, ‘आम्हाला इझमायट्रिपसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. आमचा विश्वास आहे की, यामुळे ईव्ही संक्रमणाला अधिक चालना मिळेल आणि व्यक्ती हरित भविष्याासाठी सक्रियपणे योगदान देण्यास सक्षम होतील, ज्यामुळे पर्यावरणामध्ये आमूलाग्र आणि सकारात्मक बदल घडून येईल.’
या सहयोगामधून परिवहन क्षेत्राच्याल डिकार्बनायझेशनप्रती निर्णायत्मक पाऊल दिसून येते, जिथे दोन्ही कंपन्या पर्यावरणदृष्ट्या अधिक जागरूक आणि जबाबदार प्रवासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.