दादा कोंडके यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर…२३ जूनला पोट धरून हसाल!

मुंबई:मराठी सिनेमा इंडस्ट्रीचे कॉमेडी किंग दादा कोंडके यांचा सिनेमा म्हणजे कधीही पाहा आणि पोट धरून हसा. प्रेक्षकांना निखळ हसवत काही ना काही संदेश देण्याची दादा कोंडके यांची शैली अफलातून होती. म्हणूनच ३० वर्षांनंतरही दादांचा सिनेमा पाहताना तो ताजातवाना वाटतो. झी टॉकीज वाहिनीने दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांची मेजवानी प्रेक्षकांना देण्यासाठी पुढाकार घेतल्याने दादांच्या चाहत्यांना हसरा रविवार साजरा करता येणार आहे.

रविवारी २३ जूनला “आगे कि सोच ” हा एक धमाल सिनेमा झी टॉकीजवर दाखवला जाणार आहे. हे हिंदी धमाल सिनेमे दादांच्या हिंदी प्रेक्षकांना ही ओढण्यात त्याकाळी यशस्वी होते.झी टॉकीज वाहिनीने उत्तमोत्तम सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारी वाहिनी म्हणून ओळख मिळवली आहे. मराठी पडद्यावर गाजलेले सिनेमे प्रेक्षकांना घरबसल्या पाहण्याची पर्वणी झी टॉकीज वाहिनीमुळे मिळते. त्यात दादा कोंडके यांचा सिनेमा पाहणे म्हणजे हास्याचा पाऊस. आठवडाभराच्या कामानंतर अनेकांचे डोळे रविवारकडे लागलेले असतात. अशा निवांत रविवारी दादांचा सिनेमा पाहण्याची संधी मिळाली तर सोने पे सुहागा. झी टॉकीज वाहिनीने हा ट्रेंड सेट केला असून दादा कोंडके यांचा सिनेमा छोट्या पडद्यावर जीवंत ठेवण्यात झी टॉकीज वाहिनीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

१६ जूनला दादा कोंडके यांचा अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी ट्रीट, “अंधेरी रात में दिया तेरे हाथ में” या सिनेमाचा आनंद प्रेक्षकांना मिळाला. अर्थपूर्ण संवाद आणि निखळ विनोद यासाठी दादांचा हा सिनेमा गेल्या ३५ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालत आहे. १६ मे १९८६ रोजी “अंधेरी रात में दिया तेरे हाथ में” हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. दोन मित्र पैसेच्या लालसेपोटी अंडरवर्ल्डमध्ये सामील होतात आणि ऐशो-आरामाची जीवनशैली जगतात. कथा त्यावेळी वळण घेते जेव्हा त्यापैकी एकाला या गोष्टींचे दुष्परिणाम जाणवतात आणि तो साधं जीवन जगण्याची इच्छा व्यक्त करतो.या सिनेमात दादा कोंडके यांच्यासोबत हिंदी अभिनेते अमजद खान, विजू खोटे, मेहमूद, दीना पाठक, भगवान दादा, उषा चव्हाण यांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा त्या काळात प्रचंड गाजला होता. विनोदी संवादाने खूप धमाल उडवली होती. पुन्हा तीच धमाल रविवारी १६ जूनला झी टॉकीज वाहिनीवर दुपारी १२:०० आणि सायंकाळी ६:०० वाजता प्रेक्षकांनी हिंदी ऑडिओसह अनुभवली.

गणपत गावातील एक साधा आणि प्रामाणिक माणूस आहे. तो गावकऱ्यांनी भाड्याने घेतलेल्या आपल्या बैलगाडीतून सामान विकून आपली उपजीविका करतो. त्याला अनेक वेळा बैलगाडीखाली झोपायची सवय असते आणि गावातील मुले त्याचे सामान चोरून पळून जातात, ज्यामुळे गणपतला नंतर पश्चात्ताप होतो. एके दिवशी सपना नावाची एक सुंदर मुलगी आपल्या मित्रांसह गावात येते आणि तिची गाडी खराब होते. गणपत त्यांना आपल्या गाडीतून नेतो आणि त्यांना गावाच्या गोष्टी सांगतो, ज्यामुळे ते मंत्रमुग्ध होतात. ते हसून लोटपोट होतात आणि आपल्या चार दिवसांच्या प्रवासाचा आनंद घेतात. गणपतला सपना आवडू लागते. लवकरच एके दिवशी ती गावात परतते, पण आता एक विवाहित महिला म्हणून. हे पाहून गणपत आश्चर्यचकित होतो पण तो ते आपल्यापुरतेच ठेवतो. सपनाचे लग्न व्यापारी शक्तिसोबत झालेले असते. गणपतची आई त्याला शक्ती आणि सपनासोबत शहरात जाऊन मदतीसाठी काम करण्यास सांगते.

‘आगे की सोच’ ही १९८८ मधील हिंदी भाषेतील नाट्य फिल्म आहे, ज्याचे दिग्दर्शन दादा कोंडके यांनी केले आहे, ज्यात दादा कोंडके, शक्ति कपूर, स्वप्ना, रझा मुराद, हुमा खान, मनोरमा वागळे, सपना आणि सतीश शाह यांनी अभिनय केला आहे.

दादा कोंडके यांच्या सिनेमांनी प्रेक्षकांना हिंदीतही तितक्याच ताकदीने हसवलं आहे. झी टॉकीज वाहिनी दादा कोंडके यांच्या हिंदी सिनेमांचे प्रीमियरसुद्धा प्रेक्षकांसमोर सादर करत आहे. त्यामुळे हिंदी प्रेक्षकांनाही दादा कोंडके यांच्या विनोदी शैलीचा आनंद लुटता येईल.

रविवारी २३ जूनला “आगे कि सोच” पाहायला विसरू नका. झी टॉकीज वाहिनीवर हसरा रविवार साजरा करा आणि दादा कोंडके यांच्या निखळ विनोदाचा आनंद लुटा.