मुंबई: १९२ वर्षांचा समृद्ध वारसा आणि उत्कृष्टतेची बांधिलकी असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ चे बहुप्रतीक्षित मंगळसूत्र महोत्सव यंदा २० व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने ‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे ट्रेडिशनल, मॉडर्न, लाइट वेट, हेरिटेज, पोल्की, डायमंड व गोकाक अशा ७ विविध श्रेणींमध्ये मंगळसूत्रांच्या तब्बल २००० नव्या डिझाईन्स सादर करण्यात येणार आहेत.
‘पीएनजी ज्वेलर्स’ चा मंगळसूत्र महोत्सव हा बहु-प्रतिक्षित वार्षिक उपक्रम असून त्यात परंपरा, वारसा, दिमाख व आधुनिकता यांचा संगम असणाऱ्या मंगळसूत्र डिझाईन्सची विस्तृत श्रेणी प्रदर्शित केली जाते. यंदाच्या या उपक्रमाला ‘महा मंगळसूत्र महोत्सव’ असे उचित शीर्षक देण्यात आले असून तो नक्कीच आजवरचा भव्य महोत्सव ठरणार आहे. ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या महाराष्ट्र व गोव्यातील सर्व स्टोअर्समध्ये साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात प्रत्येकाच्या पसंती व शैलीनुसार मंगळसूत्र डिझाईन्सचा अजोड संग्रह याद्वारे प्रदर्शित करण्यात येत आहे.
मंगळसूत्र महोत्सव हा ‘पीएनजी ज्वेलर्स’चा आघाडीचा उपक्रम असून गेली दोन दशके तो ग्राहक संपर्कातील कोनशिलाच राहिला आहे. या उपक्रमात परंपरा व समकालीन फॅशन या दोन्हीचा मान राखणारा विशाल संग्रह देऊ केला जातो. यंदाचा ‘महा मंगळसूत्र महोत्सव’ ग्राहकांना डिझाईन्समधील अजोड विविधता देऊन त्यांचा खरेदीचा अनुभव वृद्धिंगत करणार आहेच; परंतु या महोत्सवाच्या २०व्या वर्षातील यशस्वी पदार्पणाचा महत्त्वाचा टप्पाही साजरा करणार आहे.
५ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ग्राहकांसाठी ‘महा मंगळसूत्र महोत्सव’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा ‘महा मंगळसूत्र महोत्सव’ महाराष्ट्र व गोव्यातील दागिने प्रेमींना या अनोख्या डिझाईन्स पाहण्याची व खरेदी करण्याची खास संधी पुरवणार आहे. महोत्सव काळात ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे सोन्याच्या मंगळसूत्रांच्या घडणावळीवर ४० टक्क्यांपर्यंत सवलत तर हिऱ्याच्या मंगळसूत्रांच्या घडणावळीवर थेट ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.
पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘मंगळसूत्र महोत्सवाचे २० वे वर्ष साजरे करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. यंदाच्या महा मंगळसूत्र महोत्सवातून अभिनवता व परंपरा याबाबतची आमची बांधिलकी व्यक्त होते. सात वेगवेगळ्या श्रेणींमध्ये २००० हून अधिक नव्या डिझाईन्स सादर करुन आम्ही आमच्या ग्राहकांना भारतीय स्त्रीच्या प्रत्येक स्टाईल व पसंतीची पूर्तता करणाऱ्या मंगळसूत्र डिझाईन्सचा अजोड संग्रह देऊ करत आहोत. मंगळसूत्र महोत्सवाची वर्षभर प्रतीक्षा करणाऱ्या असंख्य ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याची आशा आम्ही बाळगून आहोत.’