मुंबई: अलीकडेच सूचिबद्ध ज्वेलरी किरकोळ विक्रेते पीएन गाडगीळ ज्वेलर्सला सप्टेंबर २०२४ला संपलेल्या तिमाहीत निवळ नफ्यात ५९.११ टक्क्यांनी वाढ होऊन ३४.९१ कोटी रुपयांवर पोहचला. मागील आर्थिक वर्षच्या याच कालावधीत कंपनीचा निवळ नफा २१.९४ कोटी रुपये होता, असे पीएन गाडगीळ ज्वेलर्सने नुकतेच नियामक फियालिंगमध्ये म्हटले आहे. मागील वर्षीच्या १,३७१.५१ कोटी रुपयांच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत महसूल ४५.९२ टक्क्यांनी वाढून २,००१.३१ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २५ची दुसरी तिमाही अत्यंत फायद्याची ठरली आहे. सोन्याच्या किमतीमध्ये लक्षणीय अस्थिरता असूनही आमच्या सर्व बाजारपेठांमध्ये मजबूत कामगिरी झाली आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २५च्या दुसऱ्या तिमाहीत अपेक्षा पूर्ण झाल्या. तसेच वाढीचा भक्कम पाया स्थापित केला आहे, असे पीएन गाडगीळ ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले.