पुणे: प्राध्यापक देवदत्त पाठक संशोधित १९८७ सालापासून सुरू असलेल्या शाळेच्या अभ्यासक्रमात ‘नाटकाचा तास’ हा एक अर्थाने मुलांचे व्यक्तिमत्व, क्षमता, कला, वागणं , बोलणं, चालणं, बघणं हालचाली करणे, कृती करणे, सुसंवाद यांना विकसित करुन प्रभावी करतात. रंगमंचावरील खेळांद्वारे नाटकाच्या तासामध्ये मुलांना शाळेच्या अभ्यासक्रमात शास्त्र, गणित, भाषा याबरोबरच ‘नाटकाचा तास’ गेली अनेक वर्ष नित्यनेमाने होत असतो.
‘नाटकाचा तास’मध्ये आजपर्यंत ३७१ शाळांचा समावेश आहे. दरवर्षी नवीन तीन ते चार शाळा यांचा यामध्ये सहभाग असतो, यामध्ये स्वतः प्राध्यापक देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर आणि त्यांचे विद्यार्थी सहकारी हे शाळेत जाऊन नाटकाचा तास आठवड्यातून एक किंवा दोन दिवस घेतात, एकूण ८०तासिकांचं आयोजन असते, यामध्ये अभिव्यक्ती प्रशिक्षणावर भर दिला जातो. त्याच्या अंतर्गत सकारात्मक, मन ,बुद्धी आणि शरीर याला सक्रिय करणारे रंगमंच खेळ घेतले जातात. यामध्ये स्मरण, निरीक्षण, कल्पना, विचार आणि कृती या शक्तींना आव्हान दिले जाते. त्यातूनच मुले हळूहळू तयार होतात, स्वतःची विचार आणि कल्पना प्रत्यक्ष कृतीतून प्रसंगातून घटनेतून छोट्याशा नाटूकल्यातून मांडू पाहतात आणि वर्षाच्या शेवटी एकूण सगळे तास झाल्यानंतर ही सर्व मुलं त्याचा प्रात्यक्षिक प्रयोग सादर करतात. त्या प्रयोगाच्या अंतर्गत त्यांनी केलेल्या विचार कल्पनांना नाट्यरूप त्यांनी स्वतःच दिलेले असते हे यातले वैशिष्ट्य. ही मुले उत्तम नागरिक तर बनतीलच त्याचबरोबर उत्तम प्रेक्षकही बनतील आणि त्यातलाच एखादा चुणचुणीत हुशार मुलगा पुढे आयुष्यामध्ये आपलं स्वतःचं करिअर बनवू शकतो.
यामध्ये प्रसाद ओक,आशुतोष कुलकर्णी,उपेंद्र सिधये, सुश्रुत भागवत, दीप्ती श्रीकांत, चैतन्य थरकुडे,गौरव पोळ,रवींद्र सातपुते, यतीन माझीरे, अथर्व सुदामे ,आर्यक पाठक, वैभव वाघ, नेहा कुलकर्णी अशी असंख्य नावे घेता येतील.
नाटकाच्या तासांतर्गत अनेक शाळा यासाठी मदत करत असतात ,आता तर नाटकाचा तास सर्व शाळांमध्ये बंधनकारक होत आहे ही आनंदाची बाब.
नाटक जगण्यातला आनंद शोधायला शिकवते. तसेच अनेक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वागायलाही शिकवत असं मत या नाटकाच्या तासाचे संशोधक आणि संकल्पक प्राध्यापक देवदत्त पाठक यांनी मांडले आहे.
या प्रकल्पांतर्गत गेली २५ वर्षे अनेक शाळांमधून सर्वोत्तम कुमार रंगकर्मी पुरस्कार दिले जातात. यावर्षी हे पुरस्कार आर्यन तोलनूर, अदिती पोपलभट,रिया येरडकर ,खुशी घोलप, प्रतीक चव्हाण, अनन्या जगताप यांना प्रदान करण्यात आले. या वर्षीचे ज्ञानदा प्रशाला, किरकटवाडी, पुणे, एस. एन.डी. टी. कन्या शाळा पुणे, वि.के.माटे हायस्कूल चिंचवड येथील कुमार विद्यार्थ्यांना विशेष रंगकर्मी पुरस्कार देण्यात आले आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाणच्या विशेष सहकार्याने यावर्षीचा शाळेच्या वेळात अभ्यासक्रमात नाटकाचा तास हेमंत जेरे, अमित भदे, दीपा पानसे आणि प्राजक्ता जेरे यांच्याबरोबरच विजयश्री महाडिक, माया कोथळीकर, दीपक परदेशी, लिंबराज खूने यांच्या सहकार्याने संपन्न झाला.