विद्यानिधी शाळेच्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन गौरव

मुंबई: जुहू येथील उपनगर शिक्षण मंडळ संचालित विद्यानिधी संकुलातील चार विद्या शाखांतील २५ विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध कला- क्रीडा प्रकारातील दैदिप्यमान उपलब्धीबाबत त्यांना माधुरीबेन मनसुखलाल वसा सभागृहात प्रोत्साहन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नृत्य,गायन,वादन ,मल्लखांब, वक्तृत्व,लाठीकाठी,चित्रकला ,नाट्याभिनय इ. प्रकारात विविध आंतरशालेय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना उपनगर शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. साधना मोढ, रोटरियन मधु गुप्ता आणि रोटरियन हेमांग जांगला यांचे हस्ते ट्राँफी व रोब बक्षीस देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. असे मार्गदर्शन मधु गुप्ता यांनी केले. पालकांच्या उपस्थितीत आपल्या प्रोत्साहन पुरस्कार मिळाला याचा आम्हाला आनंद होत आहे असा अभिप्राय विद्यार्थ्यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन वाघ यांनी केले.