महिंद्रा इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्ही’च्या सर्व ९ व्हेरिएंट्ससाठी नावनोंदणी १४ फेब्रुवारीपासून सुरू…

ठाणे: महिंद्रा इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्हीने जागतिक दर्जाच्या वैशिष्ट्यांसह नवे मापदंड स्थापित केले आहेत. ग्राहकांकडून मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे महिंद्रा एक्सईव्ही-९ई आणि बीई-६ यांच्या सर्व पॅक्ससाठी १४ फेब्रुवारी २०२५ ला सकाळी ९:०० वाजल्यापासून नावनोंदणी सुरू होईल. यासाठी टप्प्याटप्प्याने उत्पादन वाढवण्याची योजना आखण्यात आली असून प्रत्येक व्हेरिएंटसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ग्राहक वेगवेगळ्या किमतींमधील या अत्याधुनिक एसयूव्हींची निवड करू शकतात.

एक्सईव्ही-९ई आणि बीई-६ यांची संपूर्ण श्रेणी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून नोंदणीसाठी उपलब्ध आहे. पॅक थ्री साठी डिलिव्हरी मार्च २०२५च्या मध्यावर सुरू होणार असून इतर सर्व पॅक्स जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान वितरित केले जातील.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर https://www.mahindraelectricsuv.com/ भेट देऊ शकता. तसंच ग्राहक आपल्या पसंतीनुसार मॉडेल आणि व्हेरिएंट निवडू शकतात.