राष्ट्रीय पुरस्कार विजेते पं. आनंद भाटे यांच्या स्वरांनी सजणार “संगीत रजनी”!

मुंबई: मराठी संगीतप्रेमींसाठी एक अनमोल संधी! राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि ‘आनंद गंधर्व’ म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध गायक पंडित आनंद भाटे यांची एक संगीतमय मैफल— “संगीत रजनी”— लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.

जाई काजळ प्रस्तुत आणि दर्शन क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. पं. आनंद भाटे आपल्या सुमधुर गायनातून भावसंगीत, नाट्यसंगीत तसेच संगीतातील सुरेल गप्पा सादर करणार आहेत. त्यांच्या स्वरात रंगणाऱ्या या कार्यक्रमात रसिकांना मराठी संगीताचा अद्वितीय अनुभव घेता येणार आहे.

कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक करणार असून, संगीत संयोजन निरंजन लेले यांचे आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आहेत समीर बापर्डेकर.

“संगीत रजनी” शनिवारी २४ मे २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता, यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे होणार आहे.
प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६९९७७३८०