पंचमहाभूते फाउंडेशनद्वारे ‘मुंबई फळोत्सव २०२५’चे आयोजन !

मुंबई: दादर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात पंचमहाभूते फाउंडेशनद्वारे ‘मुंबई फळोत्सव २०२५’ चे आयोजन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मॉं के नाम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्या हरित महाराष्ट्र या दोन संकल्पनांपासून प्रेरणा घेऊन पंचमहाभूते फाउंडेशननं ‘मुंबई फळोत्सव २०२५’ कार्यक्रमाची अंमलबजावणी केली. यावेळी नोंदणी केलेल्या १५० सहकारी गृहनिर्माण संस्थाना मोफत फळझाडं वितरित करण्यात आली. प्रत्येक गृहनिर्माण संस्था आणि व्यक्तीला ५ फळझाडं विनामूल्य देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ, अमली पदार्थ विरोधी शाखेचे समीर वानखेडे, पंचमहाभूते फाउंडेशनचे संस्थापक संचालक अमित सावंत, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, संतोष सावंत, अमोल परब, गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, एनएसएसचे स्वयंसेवक आदी उपस्थित होते.

ग्लोबल वॉर्मिंग आणि कार्बनचे उत्सर्जन पाहता शहरात देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे, हा संदेश लोकांच्या मनात रुजवण्यासाठी फाउंडेशनने फळझाडे वाटपाचा हा उपक्रम हाती घेतला होता. याअंतर्गत हजारो फळझाडांचं वाटप कार्यक्रमात करण्यात आले.

पंचमहाभूते फाउंडेशनने नो बाथ डे, टू मिनिट्स शॉवर, से नो टू प्लॅस्टिक अशा अभिनव उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यासोबतच अर्बन फॉरेस्ट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पर्क्युलेशन पिट्स, नेल फ्री ट्री यासारखे उपक्रम राबवत असते. पर्यावरण विघ्नहर्ता ही राज्यस्तरीय पर्यावरणस्नेही मूर्ती आणि सजावट स्पर्धा हा पंचमहाभूतेचा एक विशेष उपक्रम आहे.