मुंबई: उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने त्यांचा पहिला जागतिक पेमेंट पर्याय, इंटरनॅशनल रुपे सिलेक्ट डेबिट कार्ड लाँच केले आहे. ग्राहकांना आधुनिक, सर्वसमावेशक आणि जागतिक स्तरावर सुलभ बँकिंग सोल्यूशन्स देण्याच्या बँकेच्या व्यापक उद्दिष्टाचा हा एक भाग आहे.
रुपे-डिस्कव्हर नेटवर्कच्या साहाय्याने हे कार्ड जागतिक स्तरावर एटीएम, पीओएस टर्मिनल्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर स्वीकारले जाईल. जे सातत्याने प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी तसेच बँकिंग गरजा ऑनलाइन पूर्ण करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत सोयीचे ठरते.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) रुपे इंटरनॅशनल सिलेक्ट डेबिट कार्डाच्या फायद्यांमध्ये, देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये दर तिमाहीत दोन मोफत प्रवेश, वर्षाला एक आंतरराष्ट्रीय लाउंज प्रवेश, वैयक्तिक अपघात विमा आणि ₹१० लाखांच्या कायमस्वरूपी अपंगत्व विमा कव्हरचा समावेश आहे. याशिवाय मोफत गोल्फ धडे गिरवण्याची संधी कार्डधारकांना तिमाहीत मिळणार आहे. याबरोबरच आरोग्य सेवा, कॅब अॅग्रीगेटर्सकडून ट्रॅव्हल कूपन आणि वार्षिक प्रीमियम आरोग्य तपासणी अशा सोयी देखील त्यांना मिळणार आहेत. परदेशात रोख रकमेबाबत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास आपत्कालीन कन्सिअर्ज सेवा, तसेच देशांतर्गत २४*७ सेवा, व्यवहारासाठी उच्च मर्यादा आणि संपर्करहित पेमेंट असे अतिरिक्त फायदे देखील उपलब्ध आहेत.
उज्जीवन एसएफबी रिटेल लायबिलिटीजचे प्रमुख – टीएएससी आणि टीपीपी, हितेंद्र झा म्हणाले, “इंटरनॅशनल रुपे सिलेक्ट डेबिट कार्ड हे ग्राहकांना विनाअडथळा आणि सुरक्षित जागतिक बँकिंग अनुभव देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आर्थिक सर्वसमावेशाच्या व्यापक उद्दिष्टांसह सोयीचे संयोजन करण्यासाठी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक डिजिटल-फर्स्ट सोल्यूशन्स ऑफर करण्याचा प्रयत्न करते. हे कार्ड डिजिटली जाणकार, प्रवासासाठी तयार आणि महत्त्वाकांक्षी ग्राहकांना सेवा देण्यास तसेच आपल्या ग्राहकांची किंमत जगभरात वाढवण्यास मदत करेल.”
सोय, सुरक्षितता आणि प्रीमियम जीवनशैली शोधणाऱ्या ग्राहकांच्या बदलत्या बँकिंग गरजांशी सुसंगत असा एक मजबूत पोर्टफोलिओ आपल्या ग्राहकांना देण्याचा उज्जीवन एसएफबीचा प्रयत्न आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे:
प्रत्येक तिमाहीत देशांतर्गत दोन मोफत विमानतळ लाउंज प्रवेश
दरवर्षी एक मोफत आंतरराष्ट्रीय विमानतळ लाउंज प्रवेश
वैयक्तिक अपघात आणि कायमस्वरूपी अपंगत्व कव्हर ₹ १० लाख
गोल्फ प्रशिक्षणाची संधी किंवा प्रत्येक तिमाहीत एक सत्र
प्रत्येक तिमाहीत एक मोफत आरोग्य सेवा
दरवर्षी एक मोफत प्रीमियम आरोग्य तपासणी
प्रत्येक तिमाहीत कॅब अॅग्रीगेटर्सकडून एक मोफत प्रवास कूपन
आंतरराष्ट्रीय ठिकाणी आपत्कालीन रोख कन्सीअर्ज सेवा
देशांतर्गत २४/७ कन्सीअर्ज सेवा
इतर खास ऑफर
उच्च व्यवहार मर्यादा
संपर्करहित व्यवहार