देवदत्त पाठक यांच्या ‘नाटकाचा तास’ पुस्तकाचे प्रकाशन…

पुणे:’नाटकाचा तास’ घडवेल कला, सामाजिक कौटुंबिक, वर्तनासाठी परिपूर्ण जाणीव… असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या उषा देशपांडे यांनी केले. देवदत्त पाठक यांच्या ‘नाटकाचा तास’ या विसाव्या पुस्तकाचे देवदत्त प्रकाशनकडून प्रकाशन करण्यात आहे. केंद्र सरकारच्या नव्यानेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात समाविष्ट झालेल्या, रंगभूमी कलेला अधिक शिस्तबद्ध पद्धतीने मुलांसाठी उपयोगात आणण्यासाठी प्रा.देवदत्त पाठक यांनी ४० रंगमंचीय खेळांचे पुस्तक एक कृती पुस्तक म्हणून लिहिले आहे. यामध्ये मुलांचे कौटुंबिक, सामाजिक आणि शैक्षणिक, सकारात्मक वर्तन याचा दर्जा वाढीस लागेल, असे एच आय व्ही (HIV)पॉझिटिव्ह मुलांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या उषा देशपांडे म्हणाल्या. सर्व शैक्षणिक , सामाजिक संस्थांनी कोणाचीही वाट न बघता स्वतःहूनच या अशा प्रकारच्या नाटकाच्या तासाच्या पुस्तकाला प्राधान्य देऊन ,आपापल्या संस्थांमध्ये अशा प्रकारचा नाटकाचा तास आरंभ करावा, असेही सुचवले.गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवर्य देवदत्त पाठक यांचे हे पुस्तक देवदत्त प्रकाशनने प्रकाशित केले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या उषा देशपांडे,बाल संगीत तज्ञ गौरी बनसुडे,बाल रंगभूमी अभ्यासक मिलिंद केळकर प्रसिद्ध झुंबा एक्वा डान्स तज्ञ राहुल फाटक आणि गुरु स्कूलच्या छोट्या आणि मोठ्या शिष्यांच्या हस्ते नाटकाचा तास, या पुस्तकाचे प्रकाशन झाले. केवळ बालगटासाठी म्हणजेच पहिली ते चौथीच्या वयोगटासाठी हे पुस्तक लिहिले गेले असून, या वयातील मुलांची मानसिकता, विचार शक्ती, कल्पना शक्ती, निरीक्षण शक्ती, स्मृतिशक्ती आणि कृती शक्ती याचा विचार करूनच ती कशा पद्धतीने प्रगत होईल आणि त्याचा त्यांच्या दररोजच्या जगण्यासाठी, अभ्यासासाठी, त्याचा कसा उपयोग होईल, यासाठी यातील रंगमंच खेळांची नव्याने रचना केलेली आहे,असे प्रतिपादन गुरु स्कूलचे संस्थापक गुरुवर्य देवदत्त पाठक यांनी यानिमित्ताने केले.

मिलिंद केळकर यांनी या पुस्तकाची निर्मिती म्हणजे बालरंगभूमी कलेसाठी दमदार शैक्षणिक स्वरूपाचे पुढचे पाऊल आहे ,तर गौरी बनसुडे यांनी रंगमंच खेळातील ताल, लय यांचा वापर मन, बुद्धी, शरीर ,यामध्ये कसा भिनतो हे स्पष्ट केले. राहुल फाटक यांनी जसे नृत्यात ताल आणि लय चे महत्व असते, त्याहीपेक्षा नाटकात समूह आणि त्याचे सहकार्य आणि त्याच्यावरती एकमेकाप्रतीअसलेला आदर प्रतिसाद कसा असावा याबद्दल नाटकाचा तास या पुस्तकात कसे आहे हे स्पष्ट केले. नाटकाचा तास हे रंगमंचीय खेळांचे पुस्तक बालगटासाठी शैक्षणिक क्षेत्रात नव्याने सकारात्मक बदल घडवेल असे मत शिष्या प्रा. गौरी पत्की यांनी शिष्यांच्या वतीने प्राथमिक प्रतिक्रिया दिली.