झी मराठीने दिला राजेशाही अनुभव ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेच्या पत्रकार परिषदेत ५-कोर्स मेजवानी

मुंबई: मनोरंजन क्षेत्रात नवीन शो लॉन्चचा एकच उद्देश असतो तो म्हणजे जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं. आणि हाच अनुभव अविस्मरणीय आणि भव्य करण्यासाठी झी मराठी वाहिनीने ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेच्या पत्रकार परिषदेच आयोजन एका ऐतिहासिक आणि आलिशान ठिकाणी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाकडे पाहणाऱ्या जगप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये केलं. गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ रॉयल्टी, मान्यवर आणि इतिहास घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना आदरातिथ्य देणाऱ्या या ऐतिहासिक ताज महाल पॅलेस हॉटेलमध्ये झी मराठीने ही पत्रकार परिषद आयोजित करून उपस्थित पत्रकार, कलाकार आणि पाहुण्यांना एक अद्वितीय अनुभव दिला. मालिकेतील सौंदर्य दाखवण्यासाठी, पत्रकार परिषदेस एका खास सादरीकरणाने सुरुवात झाली. मालिकेच्या कलाकारांनी मंचावर एक स्किट सादर केलं. या स्किटमध्ये कलाकारांनी त्यांच्या पात्रांची ओळख एकदम सर्जनशील आणि सजीव पद्धतीने करून दिली. या सादरीकरणात अधिरा आणि रोहनच्या आयुष्यातील एका खास प्रसंगाची झलक दाखवण्यात आली. यावेळी मालिकेतील सुबोध भावे (समर राजवाडे), तेजश्री प्रधान (स्वानंदी सरपोतदार), राज मोरे (रोहन सरपोतदार), पूर्णिमा डे (अधिरा राजवाडे), सुलभा आर्य (नलिनी आजी), भारती पाटील (मंदाकिनी सरपोतदार), किशोरी आंबिये (मल्लिका राजवाडे), किशोर महाबोले (दिलीप सरपोतदार), हरीश थोरात (अंशुमान राजवाडे), अपूर्वा विजय (सुष्मिता सरपोतदार) आणि अक्षता नाईक (अर्पिता) . हे कलाकार उपस्थित होते.

यानंतर समर राजवाडे (सुबोध भावे) यांनी उपस्थित पाहुण्यांना या खास प्रसंगानिमित्त राजवाडे कुटुंबातर्फे खास ५-कोर्स मेजवानीचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित केलं. शाही मेजवानी, आलिशान परिसर आणि सुसंवादाच्या संमीलनाने संपूर्ण वातावरण अधिक संस्मरणीय झालं.

उपस्थित पाहुण्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा भरभरून आनंद घेतला. उत्तम आदरातिथ्याने सगळेच भारावून गेले. ‘वीण दोघातली ही तुटेना’ ही मालिका फक्त एक कथा नसून, ती एक भावना आहे- दोन घरांच्या, दोन कुटुंबांच्या, आणि दोन व्यक्तिमत्त्वांच्या गुंफलेल्या नात्यांची. झी मराठीने या मालिकेच्या भव्य सुरुवातीद्वारे हे सिद्ध केलं आहे की कथा फक्त स्क्रीनवरच नाही, तर अनुभवामधूनही जिंकता येते.

तेव्हा अनुभवायला विसरू नका ११ ऑगस्टपासून ‘वीण दोघातली ही तुटेना’ सोमवार- शनिवार संध्याकाळी ७:३० वाजता सदैव आपल्या झी मराठीवर.