शाळेच्या अभ्यासक्रमात ‘नाटकाचा तास’ नवीन वर्षात सुरू…

पुणे:शाळेच्या अभ्यासक्रमात नाटकाचा तास नवीन वर्षामध्ये नवीन चार शाळांमध्ये सुरू झाला आहे. प्राध्यापक देवदत्त पाठक संशोधित गेल्या ४० वर्षापासून चालू असलेला ३७५शाळांपर्यंत पोहोचलेला आहे. रोटरी क्लब ऑफ पाषाण रोटरी क्लब ऑफ कोथरूड आणि रोटरी क्लब ऑफ टिळक रोड यांनी पुढाकार घेऊन मुलांसाठी रंजक, प्रबोधक आणि विकसनाला पूरक ठरणारा हा नाटकाचा तास सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राजक्ता जेरे, देवदत्त हंबरडीकर आणि गायत्री लडकत या तीन अध्यक्षांनी मिळून त्यांच्या रोटरी क्लबच्या सभासदांच्या मदतीने हा अभिनव उपक्रम अनेक शाळांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतलाय. नाटकाच्या तासाच्या अंतर्गत रंगमंचीय खेळ ही अनोखी संकल्पना उपयुक्त ठरत आहे .

नाट्यकला ही वर्तनाचा वेद मानून त्याचे मुलांचे असलेले नाते हे लहानपणापासूनच आहे, मुलांचे वागणं ,बोलणं, वावरणं, चालणं ,बघणं हालचाली करणं, कृती ,विचार ,कल्पना , निरीक्षण हे मुलांच्या संपूर्ण व्यक्त होण्याला दुरुस्त करते. सामाजिक भान सुधारण्याच्या दृष्टिकोनातून खोलवर असा नाटकाच्या तासातून त्यांना संस्कारले जाते,असे प्रतिपादन यानिमित्ताने देवदत्त पाठक प्रकल्प संकल्पक आणि संशोधक यांनी केले. देवदत्त पाठक यांच्याबरोबर त्यांच्या टीममध्ये बालरंगभूमी अभ्यासक मिलिंद केळकर, सीमा जोगदनकर, धनश्री गवस, ऋतुजा केळकर, आलोक जोगदंनकर आणि गौरी पत्की, गौरी बनसुडे या त्यांच्या विद्यार्थ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.

४०तासांच्या या प्रकल्पामध्ये मुलांची अभिव्यक्ती त्या अनुषंगाने त्यांचं व्यक्तिमत्व आणि क्षमता आणि ललित कला विकसन यावर भर दिला जात आहे . त्यातूनच त्यांना प्रयोग , परीक्षा आणि प्रमाणपत्र या पर्यंत नेले जाणार आहे. या प्रकल्पाचा उद्घाटन कार्यक्रम किरकट वाडी येथील ज्ञानदा प्रशालेमध्ये झाला. शाळा प्रमुख परशुराम खुणे आणि संयोजन प्रमुख दीपक परदेशी यांनी नाटकाच्या तास हा मुलांचा आत्मविश्वास वाढणं आणि त्याबरोबर अभ्यासातील लक्ष आणि खेळातील चैतन्य यासाठी विविध पातळीवर उपयुक्त ठरतो आहे असे मत व्यक्त केले.रोटरी क्लबचे सामान्यातल्या सामान्य तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी पूरक आणि पोषक असे प्रकल्प कसे पोहोचतील हे कर्तव्य प्रति सामाजिक धोरण गावा, वस्त्यांमधील शाळांमध्ये सर्वांनाच उपयुक्त ठरते आहे, असे प्रतिपादन प्रा. देवदत्त पाठक यांनी यानिमित्ताने केले. रोटरी क्लबचे विविध मान्यवर संचालक दीपा पानसे, सत्यजित चितळे , नरेंद्र खेडकर ,अभिजीत वाणी आणि शिक्षक आणि मुले या वेळेला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *