विद्यानिधी विद्यालयात श्रावण महिन्यात परिपाठ

मुंबई: विद्यानिधी व्र.पा. मराठी माध्यम विद्यालय येथे दिनांक २३ ऑगस्ट २०२५ ला श्रावण महिन्याच्या परिपाठाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता ९वी बच्या विद्यार्थ्यांनी श्रावण सखा – सणांचा महिना या विषयावर नारळी पौर्णिमा, गोपाळकाला, रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिन यांबद्दल सर्जनशील माहिती सादर केली. नृत्य, संगीत, गायन, कथाकथन आणि वक्तृत्व यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संकल्पना प्रभावीपणे मांडली. पूण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यावरील माहितीपूर्ण भाषण विशेष लक्षवेधी ठरले. जुहू अरायस समितीचे आदरणीय सदस्य मधुकुमार राठी आणि अध्यक्ष राध्येशाम गुप्ता यांची उपस्थिती लाभली. परिपाठ यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला.