गणेश उत्सवात नाटक घरात

पुणे:गणेशोत्सव म्हणजे सर्व कला देवतेचे जागरण. प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत घराघरात वेगळी,त्यातून कलाकारांचे, व्यक्त होणे म्हणजे तर नृत्य, गायन वाद्यवादन ,अभिनय, नाटक चित्रकला, असं कितीतरी १४विद्या ६४कलांचा संगमच. प्रा. देवदत्त पाठक यांनी तर नाटक घरात ही संकल्पना गेल्या नऊ वर्षापासून रुजवली आहे. मुंबई ,पुणे, सोलापूर ,पिंपरी चिंचवड ,आंबेगाव कात्रज , नऱ्हे इत्यादी गाव आणि शहर उपनगरामध्ये याचे प्रयोग होत आहेत.यामध्ये मुलांचं एक आणि मोठ्यांचा एक असे दोन नाट्य अनुभव त्यांनी बसवले आहेत, गणेशोत्सवामध्ये तुमच्या घरी येऊन त्यांची गुरु स्कूल गुफांन ची टीम नाटक करते ,या वेळेला अभ्यासाच्या नावानं चांगभलं, आणि सध्या तो काय करतो, या दोन नाटकाचे प्रयोग ते घरात गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये करत आहेत.

लेखन ,दिग्दर्शन नी सबकुछ केलेल्या देवदत्त पाठक यांची ही अनोखी संकल्पना आहे नाटक घराघरात रुजवले तर ते प्रेक्षागृहात गृहात अधिक संख्येने रसिकांच्या पसंतीने बहरेल. आणि नाटकाला सुगीचे दिवस येतील. नाटक घरात म्हणजे घरातल्या छोट्याशा जागेतही कुठल्याही प्रकारचे अवडंबर न करता घरातलेच नेपथ्य अर्थात वस्तू वापरून घरातल्याच लाईटचा वापर करून, लेखन आणि अभिनय याचा सशक्त वापर करून , सदर प्रयोग होतात.आजपर्यंत तीनशे प्रयोगापर्यंत या प्रकल्पाने मजल मारली आहे.घरामध्येच नाटकाचा अनुभव घरातले घेतात. यामध्ये त्यांना मिलिंद केळकर हे प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून म्हणून सहकार्य करीत आहेत
नाटक प्रेक्षागृहात, सोसायटीच्या हॉलमध्ये, शाळांमध्ये होत असताना ते चक्क घरात करणे याची मजा काही औरच आहे ,घरामध्येही नाट्यगृहाचा आणि नाटकाचा अनुभव देणे म्हणजे एका अर्थाने घराघरात कला रुजवण्यासारखंच आहे, असे प्रतिपादन यानिमित्ताने या संकल्पनेचे संशोधक प्रा.देवदत्त पाठक यांनी केले आहे .

त्यांना या प्रकल्पामध्ये विद्यार्थी म्हणून गुरु स्कूलच्या मल्हार बनसुडे ,अर्णव देशपांडे ,गौरी पत्की, गौरी बनसोडे ,अक्षय खामकर ,गणेश भोसले धनश्री गवस , उषा देशपांडे ऋतुजा केळकर, सीमा जोगदनकर यांनी सहकार्य केले आहे. अभ्यासाच्या नावानं चांगभलं या मुलांच्या नाटकात मुले अभ्यास करताना त्या अभ्यासाचे कसे तीन तेरा करतात आणि अभ्यासापेक्षा इतर गोष्टी कशा करतात, त्यातून त्यांना अशा परिस्थितीत कसा धडा मिळतो,या संकल्पनेवरती योजलेले हे विनोदी पण अभ्यासाच्या बाबतीतली योग्य ती जाणीव करून देणारे हे नाटक आहे .

तर तो सध्या काय करतो, मोठ्याच्या नाटकात खूप शिकूनही ,अगदी इंजिनियर होऊनही कसं नोकरीचे नैराश्य यामुळे युवकांची विशेषता मुलांची काय वाईट अवस्था होते आहे यावरचे हे नाटक सगळ्यांना अंतर्मुख करते. नाट्यनिर्मितीचा खर्च हा प्रचंड आहे त्यामध्ये एक सुवर्ण मार्ग म्हणून कमी खर्चात, कमी तांत्रिक गोष्टीत, नाटकाचा परिपूर्ण अनुभव देणारा हा अनोखा प्रयोग प्रकल्प देवदत्त पाठक मिलिंद केळकर आणि गुरुस्कूल गुफांनचा विद्यार्थी समूह गणेशोत्सवाच्या निमित्ताने घराघरात पोहोचवत आहे.