पद्मश्री सुरेश वाडकर, सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि इतर नामवंत कलावंत करणार सुरेल सादरीकरण
मुंबई:’सुगी ग्रुप’तर्फे दरवर्षी आयोजित केला जाणारा अत्यंत प्रतीक्षित सांस्कृतिक सोहळा — ‘दिवाळी पहाट’ — यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. दिवाळी उत्सवाच्या प्रारंभी दरवर्षी प्रमाणे पहाटेच्या मंगल सुरांनी उजळलेली ही परंपरा म्हणजे केवळ एक संगीत सोहळा नसून, महाराष्ट्राच्या समृद्ध संगीत वारशाचा आणि दिवाळी च्या आनंदाचा एकत्रित उत्सव आहे.
प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिर येथे सोमवार दिनांक २० ऑक्टोबर २०२५ ला सकाळी ६.०० वाजता या सोहळ्याची नरक चतुर्दशी म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुंदर सुरुवात होणार आहे.
या वर्षीची ‘दिवाळी पहाट’ ही सर्वात मोठी, भव्य आणि प्रतिष्ठित ठरणार आहे. या कार्यक्रमात देशभरातील प्रसिद्ध व राष्ट्रीय स्तरावर ख्यातनाम गायक कलावंत आपली सादरीकरणे सादर करणार असून, पारंपरिक, शास्त्रीय आणि लोकसंगीत यांचा सुंदर मिलाप या सोहळ्यात अनुभवायला मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे एकूण ५० मान्यवर कलाकार मंचावर एकत्र उपस्थित राहून आपल्या सुरेल सादरीकरणांनी सकाळ अधिकच मंगलमय करणार आहेत.
या कार्यक्रमात सादर होणारे मान्यवर कलाकार:
पद्मश्री सुरेश वाडकर*, प्रख्यात शास्त्रीय गायक
राहुल देशपांडे, ख्यातनाम शास्त्रीय गायक आणि संगीतकार
वैशाली सामंत, सुगम संगीत व चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायिका
संजीवनी भेळेंडे, बहुमुखी पार्श्वगायिका व भक्ति संगीत गायिका
नंदेश उमप, लोकसंगीत व नाट्य सादरीकरणासाठी ओळखले जाणारे कलाकार
समीर दाते, पुरस्कारप्राप्त पार्श्वगायक
अपूर्वा निषाद, तरुण आणि गुणीगायिका
अनन्या वाडकर, तरुण गायिका व सितारवादक
या वर्षीचा दिवाळी पहाट सोहळा सुप्रसिद्ध कलाकार शंकरशन कर्हाडे,स्पृहा जोशी, समीरा गुजर आणि संजय महाले यांच्या निवेदनातून सादर केला जाणार आहे.
“प्रत्येक कुटुंबाने एकत्र येऊन या पहाटेचा आनंद अनुभवावा, संगीताच्या सुरेल साखळीतून दिवाळीच्या उत्सवाचे स्वागत करावे, अशी आमची मनापासून इच्छा आहे,” असे सुगी ग्रुपचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार निशांत देशमुख यांनी सांगितले.
“दिवाळी पहाट ही मराठी संस्कृतीची जपणूक करण्याचा आणि आनंद व प्रकाश सर्वांसोबत वाटण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.”
कार्यक्रमात प्रवेश आमंत्रण पत्रिकाद्वारेच मिळेल. प्रत्येक पास एका व्यक्तींसाठी वैध आहे. आसन व्यवस्था ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ या तत्त्वावर सर्व सभागृहामध्ये केली जाईल – रवींद्र नाट्य मंदिर, लघु नाट्यगृह, कलांगण, लोककला दालन, बहुविध दालन, आणि नॅनो थिएटर. कार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन सकाळी ५:०० वाजता होईल.
सुगी ग्रुप समाजाभिमुख कार्य आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्राच्या वारशाचे जतन करत आहे. कला आणि संस्कृतीचे जतन हे सुगी ग्रुपचे ध्येय असून, समाजातील ऐक्य आणि आनंद वाढविणारी अशी सांस्कृतिक अनुभव यात्रा निर्माण करणे हेच या उपक्रमामागचे उद्दिष्ट आहे.
मोफत प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध
रवींद्र नाट्य मंदिर – प्रभादेवी, शिवाजी मंदिर – दादर,
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक – दादर,
शिवाजी पार्क जिमखाना – दादर,
दिनानाथ नाट्यगृह – विलेपार्ले आणि
सुगी ग्रुप कार्यालय – वरळी