पुणे:’ओझं’ देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांनी दिग्दर्शित केलेला नवीन लघुपट (शॉर्ट फिल्म). गु डी शि म ची निर्मिती हमारा मुव्हीज हम चैनलवर जरूर बघा. मुलींच्या मागण्यांचे ओझे मुलांना पेलवेना.
ओझं …लग्न संस्था टिकली पाहिजे ,आपण ती टिकवली पाहिजे.त्यासाठी मुला-मुलींवरती धीर त्याग आणि योग्य सहवास यांचा संस्कार मुलांवरती लहानपणापासूनच होत होता . पण जसे एकविसाव्या शतकाकडे आपण वाटचाल करतो आहोत तसतसे स्वातंत्र्य, वैयक्तिक मत आणि आचरण याबाबतीतली कृतिशील वाट बिघडत चालली आहे. लग्न करू नये पासून, लग्नाशिवाय कोणाबरोबर तरी रहावे असे अयोग्य विचारांचे सध्या थैमान आहे. लग्नासाठी असलेल्या विशिष्ट अटी यावरती आडून बसलेल्या मुली, यामुळे संसार संकल्पनाच ही उध्वस्त होऊ शकते की काय याची धास्ती आहे .
आजच्या मुलांना करिअरमधील संघर्ष ,आर्थिक टारगेट, स्पर्धात्मक गुणवत्ता याचा विचार करताना लग्न करण्यासाठी आवश्यक असलेल्या मुलींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मर्यादा पडत आहेत , सरकते वय ,शारीरिक मर्यादा आणि मतभेदांची होत असलेली सरशी यामुळे आजची युवा प्रौढ मुले ही कसं लग्न होणार? आणि ते कसे टिकणार याबाबतीत साशंक आहेत.असा विषय रोखठोक पद्धतीने मांडणारा “ओझं” हा लघुपट आहे. सर्वच पातळीवर लेखन, दिग्दर्शन, संगीत अभिनय, कथा ,पटकथा संवाद यावरती आपले कौशल्य निर्माण करणाऱ्या देवदत्त पाठक यांची गरुड झेप आहे. त्यांचेच विद्यार्थी सुमित दांगट यांची मूळ कल्पना साकारून लघु चित्रपट निर्मितीमध्ये गु डी शि म ची ही निर्मिती आहे. ती निर्माण करण्यासाठी सुमित दांगट यांची निर्माता म्हणून साथ मिळाली आहे. मिलिंद केळकर या त्यांच्याच विद्यार्थ्यांनी दिग्दर्शनाचे त्यांच्यासह काम पाहिले आहे. उत्कृष्ट विषय ,आशय ,गोष्ट संवाद आणि सामाजिक भान जपणाऱ्या या लघुपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आजच्या युवा आणि प्रौढ होत चाललेल्या मुला मुलींनी आपलाच विषय आपलीच खंत समजून घेण्यासाठी हा लघुपट बघणे गरजेचे आहे.
या लघुपटामध्ये देवदत्त पाठक सुमित दांगट श्वेतालीअडसूळ ,गौरी बनसुडे इ.अनेक जणांच्या देवदत्त पाठक यांच्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हमारा मूवी हम चॅनेल वरती वर हा लघुपट हटके आणि समाजातील सध्या निर्माण होत असलेल्या मुलांच्या घुसमटीची एक टोकदार संवेदना आहे. आनंद पवार यांनी याची लघुपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे ,तर दर्शन पोळ, संतोष शिंदे यांनी यातील संपादनाचे व तांत्रिक सहाय्य केले आहे “ओझं” मुलींच्या वाढत चाललेल्या मागण्यांचे आहेच , त्याचबरोबर नवीन निर्माण होत असलेल्या लब्ध प्रतिष्ठित समाजाने लग्न या संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायलाच हवा हे सांगणारा ही लघुपट (शॉर्ट फिल्म) सर्वांनी आवर्जून बघायला हवा.