झी मराठीवर होळीला निमित्त होणार महामालिकांचा महासंग्राम !

मुंबई: झी मराठीने होळीनिमित्ताने प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा खास बेत रचला आहे. यात परंपरेनुसार होळी साजरी होणार, यात पालखी नाचवली जाणार तसेच रंगपंचमी सुद्धा साजरी होणार आहे. अभिराम, सूर्या, आदित्य, आशु आणि सिद्धू एकत्र येऊन पालखी नाचवणार आहेत. मालिकांच्या या महासंग्रामात असे प्रसंग निर्माण होणार आहेत जिथे नायिका आणि खलनायिकांचा सामना होणार आहे. ही होळी आणि धुळवड नायिकांसाठी साधी नसणारे, कारण त्यांना खलनायिकांनी आणलेल्या अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. एकीकडे हे सर्व सुरु असताना तुम्हाला या कलाकारांची धमाला मज्जा, मस्ती, आणि काही सरप्राईजने भरलेले डान्स परफॉर्मन्स ही अनुभवता येणार आहेत. ‘हिंदवी पाटील’ खास पाहुणी म्हणून कार्यक्रमात सहभागी झाली. तिनी खास लावणी सादर केली.

सर्वांची लाडकी लीला म्हणजेच ‘वल्लरी विराज’ने होळी महासंगमबद्दल बोलताना सांगितले, “तुम्हा सर्वांना आम्हाला एकत्र पाहून मज्जा येणार आहे. आम्ही सर्व नायिकांनी कमरेला ढोल बांधून वाजवले, ते ढोल जड होते आणि आम्हाला इतका ढोल वाजवायचा अनुभव नाहीये. पण एक नवीन गोष्ट शिकण्याचा आनंद होता. तर दुसरीकडे सर्व मुलांनी पालखी नाचवली आहे. आम्ही मुलींनी तेव्हा जोशात ढोल वाजवले. पण नंतर आम्हाला बॉडीपेन व्हायला लागलं. मालिकांमध्ये काम करण्याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला सर्व सण दोनदा साजरे करायला मिळतात. ‘महामालिकांच्या महासंगम’मध्ये अनेक सर्प्राइजेस आहेत त्यात एक म्हणजे सर्व जोडप्याचे डान्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. यासोबत आणखीन काही सर्प्राइजेस आहेत. होळीचा सण म्हटलं तर पुरणपोळी आणि थंडाई बिना पूर्ण होऊ शकत नाही. तर खास होळीची मेजवानी ही होती ज्यात अनेक स्वादिष्ट पदार्थ होते. तर तुम्ही नक्की पहा आमची मज्जा, मस्ती महामालिकांच्या महासंगममध्ये ”

तेव्हा या महासंग्रामात कोणाचा विजय होणार ? नायिका, खलनायिकांना धडा शिकवू शकतील ? या महासंगमात कोणाचा सरप्राईझ डान्स बघायला मिळणार आहे जो प्रेक्षकांच लक्ष वेधून घेईल. यासाठी बघायला विसरू नका महामालिकांचा महासंगम १५ मार्च आणि १६ मार्चला संध्याकाळी ७:०० ते ९:३० फक्त आपल्या झी मराठीवर.