मुंबई:आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (एएचएफएल) आपल्या ‘आधार कौशल’ या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत मुंबईतील विक्रोळी येथील गुरुनानक उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालय येथे पूर्ण सुसज्ज ग्रंथालयाची स्थापना केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कंपनी कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे. वंचितांच्या जीवनात शाश्वत बदल घडवून सामाजिक विकासासाठी कंपनी आपले योगदान देत राहणार आहे. ही शाळा विक्रोळीच्या झोपडपट्टी भागात असून येथील बहुतांश विद्यार्थ्यांना सामाजिक-आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो. मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध नसतानाही विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी आणि शालेय उपस्थिती उत्कृष्ट व चांगली असल्याची दखल कंपनीने घेतली. ही दरी भरून काढण्यासाठी आधारने ग्रंथालय स्थापन करून आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या पलीकडे जात संसाधने उपलब्ध करून देऊन शाळेला सहाय्य करण्याचा निर्णय घेतला.
आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद म्हणाले, ‘आधारमध्ये आमचा शिक्षणाच्या परिवर्तनीय शक्तीवर विश्वास आहे आणि आमचा सीएसआर कार्यक्रम ‘आधार कौशल’ त्याच आधारावर तयार करण्यात आला आहे. हे ग्रंथालय गुरु नानक उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांसह सक्षम करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहे.’
‘आधार कौशल’ उपक्रमांतर्गत आधारच्या कर्मचाऱ्यांनी पुस्तक संकलन मोहिमेसाठी स्वेच्छेने सहभाग घेतला आहे आणि ही सर्व पुस्तके ग्रंथालयाला दान करण्यात येतील. वाचनालयामध्ये २०० पेक्षा जास्त पुस्तके, प्रेरक मार्गदर्शक, करिअर संसाधने आणि डिजिटल उपकरणांसह विविध शैक्षणिक साहित्याचा समावेश आहे. हे ग्रंथालय आधुनिक फर्निचर, एअर कंडिशनिंग आणि संगणक, वाय-फाय आणि सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही सारख्या सुविधांनी सुसज्ज आहे.
‘अनमोल अशा योगदानाबद्दल आम्ही आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे अत्यंत आभारी आहोत. या ग्रंथालयाची स्थापना आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक मौल्यवान संपत्ती असेल. याशिवाय उत्तम शिक्षणासाठी उत्तम पायाभूत सुविधा असल्याने हे ग्रंथालय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाबाहेरील ज्ञानाचा शोध घेण्यास प्रोत्साहित करेल, यात शंका नाही. त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक वाढीचा मार्ग या माध्यमातून आणखी प्रशस्त होणार आहे’, असे गुरुनानक उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालयच्या प्राचार्या डॉ.परवीन कौर नागपाल यांनी सांगितले.
वाचनाच्या सवयीतून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करून त्यांच्या औपचारिक शिक्षणाला पूरक बनून त्यांनाजगाची व्यापक समज विकसित करण्यात मदत करणे हे ग्रंथालयाचे उद्दिष्ट आहे. ‘आधार कौशल’द्वारे आधारच्या देण्यात येणाऱ्या पाठबळाचा उद्देश अल्प-सक्षम समुदायातील तरुणांमध्ये स्वयं-सक्षमीकरण, रोजगारक्षमता आणि लवचिकता वाढवून दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणे आहे.आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने देशाच्या व्यापक शैक्षणिक उद्दिष्टांना हातभार लावत भारतभरातील शाळांमध्ये अशा प्रकारची आणखी ग्रंथालये निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू ठेवण्याची योजना आखली आहे.