मुंबई: आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने ३० जून २०२४ ला समाप्त झालेल्या तिमाहीसाठी आपल्या आर्थिक निकालांची घोषणा केली. पहिल्या तिमाहीमधील प्रभावी कामगिरीसह कंपनी आगामी वर्षामध्ये प्रबळ वाढीसाठी सज्ज आहे.
कामगिरीच्या वैशिष्ट्यांमध्ये आर्थिक वर्ष २५ ची पहिली तिमाही व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (एयूएम) ३० जून २०२३ पर्यंत १७,९४७ कोटी रूपयांवरून ३० जून २०२४ पर्यंत २१ टक्क्यांच्या वाढीसह २१,७२६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचली. कर्ज खात्यांची एकूण आकडेवारी ३० जून २०२४ पर्यंत २,७४,००० हून अधिकपर्यंत पोहोचली.करोत्तर नफा आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीमधील १४६ कोटी रूपयांवरून आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत ३७ टक्क्यांनी वाढून २०० कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. निव्वळ मूल्य ३० जून २०२४ पर्यंत ५,६३३ कोटी रूपये आहे, ज्यामध्ये प्राथमिक गुंतवणूकीमधून मिळालेले आयपीओ उत्पन्न १,००० कोटी रूपयांचा (एकूण) समावेश आहे. मालमत्तांवर परतावा (आओए) आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीमधील ३.५ टक्क्यांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत ४.१ टक्के राहिला. इक्विटीवर परतावा (आरओई) आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीमधील १५.५ टक्क्यांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत १५.९ टक्के राहिला. एकूण एनपीए ३० जून २०२३ पर्यंत १.४६ टक्क्यांच्या तुलनेत ३० जून २०२४ पर्यंत १.३१ टक्के राहिले, ज्यामध्ये १५ बीपीएसने वाढ झाली.
आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीमधील कामगिरीबाबत मत व्यक्त करत आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ऋषी आनंद म्हणाले, ‘आम्ही समाजातील ईडब्ल्यूएस आणि एलआयजी विभागांसाठी हाऊसिंग फायनान्स सोल्यूशन्स उपलब्ध होण्याजोगे आणि किफायतशीर करण्यावर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करण्यासह या गतीशील बाजारपेठेत मोठी प्रगती करत या तिमाहीचा उत्सावर्धक शेवट केला. वार्षिक २१ टक्क्यांच्या लक्षणीय वाढीसह २१,७२६ कोटी रूपयांचा एयूएम गाठत आम्ही देशातील सर्वात मोठी अल्प-उत्पन्न हाऊसिंग फायनान्स कंपनी म्हणून कायम राहिलो. आमचा करोत्तर नफा वार्षिक ३७ टक्क्यांनी वाढला आहे. प्रस्ताविक अर्थसंकल्पीय घोषणांमुळे व्यवसाय विकासाला अधिक चालना मिळेल, जेथे ग्रामीण व शहरी भागांमध्ये ३ कोटी अधिक घरे बांधण्याची सूचना आणि कर्जदारांना व्याज सबसिडीचा किफायतशीर गृहनिर्माण क्षेत्रावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होईल. आमचे वितरण नेटवर्क मुलभूत ताकद राहिले आहे, जे २१ राज्यांमधील ५४४ जिल्ह्यांमध्ये असलेल्या एकूण ५३६ शाखांसह आम्हाला वरचढ ठरवते. या तिमाहीमध्ये आम्ही १३ नवीन शाखांची भर केली आहे आणि नवीन राज्य हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश केला आहे. टचपॉइण्ट्सच्या वाढत्या आकडेवारीसह आम्ही आता देशातील २७४ हजाराहून अधिक कार्यरत खात्यांना सेवा देत आहोत. पण, आमचा बाजारपेठ प्रवेश अधिक वाढवण्यासाठी आणि अल्प-उत्पन्न विभागामध्ये अधिक खोलवर जाण्यासाठी आम्ही दृढ प्रभावी धोरणासह आमची पोहोच वाढवण्याचे नियोजन करत आहोत. दृढ प्रभावामुळे आम्हाला चतुर्थ श्रेणीच्या शहरांपासून लहान तालुके आणि लहान जिल्हा मुख्यालयांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.’