आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई:’तारे जमीन पर’ च्या जादूला १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा अनुभवण्याची वेळ आली आहे! आमिर खान एक नवीन, हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करण्यास सज्ज झाले आहेत.

आमिर खान त्याच्या बहुप्रतिक्षित कौटुंबिक मनोरंजन ‘सितारे जमीन पर’द्वारे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतत आहे. ही २००७ मधील सुपरहिट चित्रपट ‘तारे जमीन पर’ची स्पिरिचुअल सिक्वेल मानली जाते. पोस्टरने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती आणि आता अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रेम, हास्य आणि आनंदाने परिपूर्ण आहे, एक परिपूर्ण सिनेमॅटिक अनुभव!

चित्रपटाचा टॅगलाईन आहे, “सबका अपना अपना नॉर्मल”, जी सर्वांना स्वीकारण्याचा आणि समावेशकतेचा संदेश देते. ट्रेलरमध्ये आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहेत, जो बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांना प्रशिक्षित करतो. या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा हलकीफुलकी विनोदी असूनही मनाला भिडणारी आणि प्रेरणादायी आहे.

‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर आनंद, आत्मियता आणि प्रेरणा यांचा सुंदर संगम आहे. त्यात हास्य आणि भावनिक क्षण यांचा परिपूर्ण ताळमेळ साधण्यात आला आहे. विशेष म्हणजे आमिर खान प्रोडक्शन्सद्वारे चित्रपटात १० नवोदित कलाकार पदार्पण करत आहे .अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर.

चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले. चित्रपटाची निर्मिती ‘आमिर खान प्रोडक्शन्स’च्या बॅनरखाली झाली आहे. ‘सितारे जमीन पर’मध्ये आमिर खान आणि जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय यांचे असून, गीतकार आहेत. अमिताभ भट्टाचार्य. पटकथा डिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे निर्माते आहेत आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भगचंदका हे आहे.